शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरातल्या ५ वस्तू लिंबू लावून कधीच स्वच्छ करू नये! वरवर चकाचक दिसल्या तरी लगेच खराब होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2024 6:24 PM

1 / 7
वेगवेगळ्या पदार्थांना जशी उत्तम चव देण्याचं काम लिंबू करतं, तसंच घरातल्या काही गोष्टी स्वच्छ करण्यासाठीही लिंबाचा खूप चांगला उपयोग होतो. (never clean these 5 things in your house by applying lemon juice )
2 / 7
पण लिंबू लावून स्वच्छता करणं काही वस्तूंसाठी खूपच धोक्याचं ठरू शकतं. तुम्ही ती वस्तू लिंबाचा रस लावून स्वच्छ केली तर ती तुम्हाला वरवर पाहता चकाचक झाल्यासारखी दिसेल. पण त्या वस्तूसाठी लिंबू मुळीच चांगलं नसतं. यामुळे ती वस्तू लवकर खराब होऊ शकते. अशा वस्तू कोणत्या आहेत ते पाहा..
3 / 7
तुमचा किचन ओटा मार्बलचा तसेच ग्रेनाईटचा असेल तर तो लिंबाचा रस लावून कधीच स्वच्छ करू नका. तसेच मार्बल किंवा ग्रेनाईटच्या फरशा किंवा इतर वस्तूही लिंबाच्या रसाने स्वच्छ करू नयेत.
4 / 7
कास्ट आयर्न प्रकारातल्या तव्याला लिंबू लावून स्वच्छ करू नका. यामुळे त्याच्यावर असणारं कोटींग निघून जाऊ शकतं. आणि मग पोळ्या त्याला चिटकू शकतात.
5 / 7
हाय कार्बन स्टील प्रकारात मोडणारे चाकू किंवा सुरी लिंबाने स्वच्छ करू नका. त्यामुळे ते खराब होतात. तुम्ही त्या चाकूने किंवा सुरीने लिंबू चिरलं तरी ती सुरू लगेच धुवून टाकावी.
6 / 7
लाकडी चमचे, चॉपिंग पॅडलाही लिंबू लावून स्वच्छ करू नये. यामुळे ते कापले जातात. त्यांच्यावर भेगा पडतात.
7 / 7
ॲल्युमिनियमच्या भांड्यांचीही लिंबाने स्वच्छता करणं योग्य नाही.
टॅग्स :Cleaning tipsस्वच्छता टिप्सHome remedyहोम रेमेडी