शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kranti Redkar : समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्याबद्दल 'या' १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 7:48 PM

1 / 9
मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar wankhede) सध्या तुफान चर्चेत आहे. मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर ड्रग्ज पार्टीवर कारवाई करत अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) १० जणांना ताब्यात घेतलं. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाचा आर्यन खानचादेखील समावेश होता. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली. प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरचे समीर वानखेडे हे पती आहेत.
2 / 9
पतीवर होत असलेल्या आरोपांना खंबीरपणे तोंड देत असलेल्या क्रांतीने मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. क्रांतीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे. १७ ऑगस्ट १९८२ मध्ये क्रांतीचा जन्म झाला. मुंबईत लहानाच्या मोठ्या झालेल्या क्रांतीनं रूईया महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं.
3 / 9
क्रांती रेडकरनं जत्रा, ऑन ड्युटी २४ तास, माझा नवरा तुझी बायको, नो एन्ट्री पुढे धोका आहे, शिक्षणाचा आयचा घो, फक्त लढ म्हणा, मर्डर मेस्त्री यांसारख्या नावजलेल्या चित्रपटात काम केले आहे. क्रांतीला जत्रा चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. कोंबडी पळाली हे गाणं तुफान गाजलं आणि क्रांती घराघरात पोहोचली.
4 / 9
त्यानंतर क्रांतीने २००३ मध्ये ‘गंगाजल’ चित्रपटात काम केले. तिनं काकण या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
5 / 9
क्रांती रेडकर हिने २०१७ साली समीर वानखेडे यांच्याशी लग्न केले आहे. हे लग्न अगदी साध्या पद्धतीनं पार पडल्याचं फोटोमधून दिसून येईल.
6 / 9
क्रांती रेडकरला दोन जुळ्या मुली आहेत. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करत क्रांती नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तर कधी तिच्या लहान मुलींमुळे चर्चेत असते.
7 / 9
क्रांतीचाही कपड्यांचा आणि ज्वेलरीचा व्यवसाय आहे. क्रांतीच्या कपड्याच्या ब्रॅण्डचे नाव ‘झिया झायदा’ (ZiyaZyda) आहे तर क्रांतीने (KraKar) ज्वेलरी ब्रॅण्डसुद्धा लाँच केला आहे.
8 / 9
काही वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीनेन आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात क्रांती रेडकरचे नाव दिले होते. या प्रकरणी क्रांतीने त्या वृत्तवाहिनीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
9 / 9
काही वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीनेन आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात क्रांती रेडकरचे नाव दिले होते. या प्रकरणी क्रांतीने त्या वृत्तवाहिनीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
टॅग्स :Kranti Redkarक्रांती रेडकरSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोSocial Viralसोशल व्हायरलCelebrityसेलिब्रिटी