शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लेडी गागाचे दिवाने ऑलिम्पिक सोहळा पाहून भारावले, ३८ व्या वर्षीही आहे पॉप आयकॉन कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2024 8:02 PM

1 / 7
(Lady Gaga)लेडी गागा. तिचे जगभर दिवाने आहेत. ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यातला तिचा परफॉर्मन्स वेड लावणारा होता. जगभरातल्या लोकांनी तो ऑनलाइन आणि टीव्ही पाहिला. लेडी गागा खऱ्या अर्थानं ग्लोबल सुपरस्टार झालेली आहे. असं काय होतं त्या सोहळ्यात ज्यानं आज जगभर लेडी गागाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा आहे.
2 / 7
१. लेडी गागा आता ३८ वर्षांची आहे. पण ती अजूनही जगभरात तरुणांची पॉप आयकॉन आहे. 'मोन ट्रुक एन प्लम्स', ज्याचा इंग्रजीत अर्थ 'माय थिंग विथ फेदर्स' हे क्लासिक फ्रेंच गाणे गाऊन तिने पॅरिस ऑलम्पिकच्या उदघाटन सोहळ्याची शानदार सुरुवात केली.
3 / 7
२. काळा आणि बेबी पिंक रंगातला फर असणारा सुंदर गाऊन तिने घातला होता. तिच्या परफॉर्मन्सचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4 / 7
३. मायक्रो-मिनी शॉर्ट्स, काळा स्ट्रॅपलेस ड्रेस आणि ऑपेरा ग्लोव्हज हा लूकही एकदम कूल दिसत होता.
5 / 7
४. तिने गाणे फ्रान्सच्या कला, संगीत आणि थिएटरसह, फ्रेंच इतिहासाचा सन्मान करणारे होते. हे गाणे पूर्वी बॅलेरिना झिझी जीनमायरने १९६१ मध्ये गायले होते. लेडी गागा म्हणालीही की मी फ्रेंच नसले तरीही फ्रेंच संगीताशी माझे एक वेगळेच नाते असल्याचे मला जाणवते.
6 / 7
५. नंतर एक ट्विट करत तिने ऑलिम्पिक आयोजक आणि फ्रान्सचे आभारही मानले.
7 / 7
६. लेडी गागाचे जगभरातले चाहते तिच्या या परफॉर्मन्सची तारीफ करत आहेतच. दरम्यान लेडी गागा आवडत्या खेळाडूंना पाठिंबा द्यायला सामने पाहायलाही जाते आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलLady Gagaलेडी गागाparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४