1 / 6राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते लालूप्रसाद यादव काही महिन्यांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त असल्याचे आपल्याला माहित आहे. किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्याने त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार हे काही दिवसांपूर्वीच निश्चित झाले (Laluprasad Yadav Kidney Transplant Surgery Daughter Rohini Acharya Donated Kidney). 2 / 6अशावेळी रक्ताचे नाते असलेली व्यक्ती आपली किडनी दान करु शकते. ७४ वर्षे वय असलेल्या लालूप्रसाद यादव यांना एकूण ९ मुले आहेत. त्यामध्ये २ मुले आणि ७ मुलींचा समावेश आहे. 3 / 6लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य वडीलांसाठी हे आव्हान स्वीकारण्यास तयार झाली. ऐकायला ही गोष्ट तितकी अवघड वाटत नसली तरी प्रत्यक्षात आपला अवयव काढून देणे ही सर्वार्थाने अतिशय अवघड गोष्ट आहे.4 / 6काल म्हणजेच ५ डिसेंबर रोजी त्यांच्यावर सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. रोहिणी या सिंगापूरमध्ये राहत असल्याने त्यांनी याठिकाणीच ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. विविध वैद्यकीय चाचण्यांची पूर्तता झाल्यानंतर हा प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. 5 / 6वडीलांसाठी मुलगी काय असते आणि काय करु शकते हेच यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. सुरुवातीला अशाप्रकारे मुलीची किडनी घेण्यास लालूप्रसाद तयार नव्हते मात्र कुटुंबिय आणि डॉक्टर यांच्याशी योग्य ती सल्ला मसलत करुन त्यांनी अखेर सहमती दर्शवली. 6 / 6रोहिणी पेशाने डॉक्टर असून त्यांचे वय ४३ वर्षे आहे. त्यांचे पती समशेर सिंह इंजिनिअर आहेत. रोहिणी यांना २ मुले आणि १ मुलगी आहे.