शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali : दिवाळीत घराचं सुंदर डेकोरेशन करा, पाहा ८ आयडिया! घर सजेल सुंदर-वाटेल प्रसन्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2024 10:00 AM

1 / 10
दिवाळी म्हटली की आपण घराची साफसफाई करतो, घरातील जुन्या झालेल्या गोष्टी बदलतो आणि घराची छान सजावट करतो. रांगोळी, दिवे, कंदील, लाईट्स - फुलांच्या माळा अशा अनेक वस्तूंचा वापर आपण सजावटीसाठी करतो. दिवाळीत फराळाला किंवा जेवायला पाहुणे येणार असतील तर घर झटपट सजवण्यासाठी काही सोप्या आयडीया पाहूयात(Last Minute Diwali Decoration Ideas).
2 / 10
दिवाळीत घराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा घराबाहेर असे काचेचे हँगिंग दिवे आपण लावून सजावट करु शकता. या काचेच्या दिव्यांमध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे बल्ब लाईट्स किंवा छोटे दिवे लावू शकता.
3 / 10
बाजारांत आपल्याला अशा प्रकारे कुंदन आणि मोती वर्क केलेले आकर्षक डिज़ाईन्सचे रेडिमेड पॅच मिळतील. हे डिज़ाईन्सचे रेडिमेड पॅच आपण उंबऱ्याच्या बाजूला, रांगोळीच्या भोवती किंवा फराळाच्या डिश भोवती सजावटीसाठी ठेवू शकतो.
4 / 10
अशाप्रकारची धातूची, काचेची अशी कोणतीही हंडी असेल तर त्यामध्ये फुलं, दिवे आणि शोभेच्या वस्तू घालून ते एखाद्या टेबलवर किंवा दारापाशी ठेवले तर खूप छान दिसते.
5 / 10
काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात तेल घालून त्यावर ठेवलेले दिवे घराची शोभा नक्कीच वाढवतात. या काचेच्या ग्लासात आपण वेगवेगळ्या रंगाचे किंवा ग्लिटरचे पाणी देखील घालू शकतो.
6 / 10
दिवाळीत आपण लाईटिंगच्या माळा वापरुन घराची सजावट तर करतोच. पण आपण असे बॅटरीवर चालणारे छोटे वेगवेगळ्या आकाराचे कंदील विकत घेऊ शकता. हे कंदील आपण खिडक्या, टेबल यावर घेऊ शकता.
7 / 10
फुलांच्या तबकांप्रमाणेच आपण घराच्या एखाद्या कोपऱ्यात असे दिव्यांचे तबक देखील ठेवू शकतो. दिवे आणि फुलांचे तबक कायमच घराला फेस्टिव्ह लूक देतात.
8 / 10
आपण घराच्या भिंतींवर अशाप्रकारे वेगवेगळ्या आकर्षक माळा सोडून घराची सजावट करु शकतो. विविध रंगांची फुले आणि पानांच्या डिझाईन्स असणाऱ्या या माळा अधिकच खुलून दिसतात.
9 / 10
दिवाळीत आपण टेबलवर मेणबत्तीचे आकर्षक स्टॅन्ड ठेवून त्यात वेगवेगळ्या रंगांच्या मेणबत्त्या लावून सजावट करु शकतो. याचसोबत बाजारांत विकत मिळणारी सुगंधित मेणबत्त्या लावून त्यांच्या मंद सुवासाने वातावरण अधिक प्रसन्न होते.
10 / 10
दिवाळीत घराला लायटिंग लावून सजवताना फक्त बल्ब किंवा छोट्या लाईट्सच्या माळा न लावता, आपण अशा प्रकारे लाईट्सच्या बल्ब भोवती वेगवेगळे डिझाईन्स असणाऱ्या लाईटच्या माळा खरेदी करु शकता.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधीSocial Viralसोशल व्हायरल