लग्नकार्यात घालायला छान ठसठशीत मंगळसूत्र घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे ८ सुंदर डिझाईन्स By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2024 9:12 AM
1 / 8 एरवी बऱ्याचजणी गळ्यात नाजूक मंगळसूत्र घालतात. किंवा बऱ्याच जणी घालतही नाहीत. पण लग्नकार्यात किंवा एखादा समारंभ असेल तर मात्र साडी नेसल्यावर गळ्यात एखादं ठसठशीत मंगळसूत्र पाहिजेच. 2 / 8 म्हणूनच लग्नसराईच्या निमित्ताने तुम्हाला लांब, घनसर अशा मंगळसूत्राची खरेदी करायची असेल तर हे काही पर्याय एकदा बघा. यातले डिझाईन्स अगदी लेटेस्ट फॅशनचे स्टायलिश आहेत. 3 / 8 हे बघा एक सुंदर स्टायलिश डिझाईन. एखाद्या डिझायनर साडीवर हे मंगळसूत्र घालायला छान आहे. 4 / 8 हे मंगळसूत्रही अगदी नव्या फॅशनचं आहे. कारण त्याची मणी ओवण्याची पद्धत अतिशय वेगळी असून बघताक्षणीच ते लक्ष वेधून घेतं. 5 / 8 असं हेवी पेंडंट असणारं एकच मंगळसूत्र गळ्यात घातलं तरी खूप छान वाटेल. इतर कोणत्या दागिन्याची गरजच नाही. 6 / 8 हे एक थोडं वेगळं डिझाईन पाहा. यामध्ये पारंपरिक वाट्या किंवा पेंडंटऐवजी छोटासा चंद्र आणि चांदण्यांचं नाजूक डिझाईन देण्यात आलं आहे. 7 / 8 या मंगळसूत्राचं पेंडंट बघा. अतिशय युनिक डिझाईन आहे. दोन्ही बाजूला दाेन हत्ती आणि मध्यभागी झुमका असं डिझाईन नक्कीच चारचौघीत उठून दिसणारं आहे. 8 / 8 हेवी पेंडंट असणारं हे आणखी एक डिझाईन् तुम्हाला आवडू शकतं. आणखी वाचा