गुरुपुष्यामृत २०२४: सोन्याच्या कमी वजनाच्या अंगठ्यांचे नाजूक डिझाईन्स- कमी पैशांत घ्या सुंदर अंगठी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2024 1:24 PM
1 / 11 गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने अनेकजणी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. साेनं सध्या खूप महाग आहे. त्यामुळे सोन्याची अगदी छोटीशी खरेदी करायची असेल तर या काही नाजूक डिझाईन्सच्या अंगठ्यांचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. कमी किमतीत मिळणाऱ्या कमी वजनाच्या अंगठ्यांचे हे काही डिझाईन्स एकदा बघाच.. 2 / 11 एकदम नव्या स्टाईलची हटके डिझाईन घ्यायची असेल तर ही अंगठी तुम्हाला आवडू शकते. 3 / 11 अंगठीमध्ये अशा पद्धतीने गुंफलेले नाजूक मोती खूप छान लुक देतात. 4 / 11 मोती आणि छोटेसे स्टोन लावलेली ही एक नाजूक अंगठी अगदी कमी वजनात आणि कमी किमतीत मिळू शकते. 5 / 11 वेगवेगळे स्टोन असलेली अंगठी आवडत असेल तर हे एक डिझाईन खूप सुंदर आहे. 6 / 11 दोन नाजुक फुलांचं हे एक सुंदर आकर्षक डिझाईन. सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी घ्यायचं असेल तर हे एक डिझाईन तुम्ही नक्कीच चॉईस करू शकता. 7 / 11 थोडं मोठं ठसठशीत डिझाईन आवडत असेल तर ही अंगठी नक्कीच तुमच्या पसंतीस उतरू शकते. 8 / 11 थोडसं नाजूक आणि एकदम हटके डिझाईन बघत असाल तर हा एक खूप सुंदर चॉईस ठरू शकते 9 / 11 अंगठीचा हा एक प्रकारही पाहा. ही अंगठी ॲडजेस्टेबल प्रकारातली आहे. त्यामुळे ही अंगठी तुम्ही कोणत्याही बोटात घालू शकता. किंवा मापाचा प्रश्नच नसल्याने तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही घालण्यास देऊ शकता. 10 / 11 ॲडजेस्टेबल प्रकारातले हे एक वेगळे डिझाईन पाहा. यातली फुलं आणखी आकर्षक आहेत. रोज वापरासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमात घालायलादेखील ही अंगठी छान दिसेल. 11 / 11 या अंगठीची खासियत अशी की ती दिसायला खूप भरीव दिसते पण वजनाला मात्र ती कमी आहे. आणखी वाचा