Low calories and high fibre food for fast weight loss, What to eat for weight loss
व्यायाम न करता वजन कमी करायचंय? मग 'हे' ६ पदार्थ खा- वजन नेहमीच राहील आटोक्यात By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2024 3:42 PM1 / 9वजन वाढू द्यायचं नसेल तर व्यायाम आणि आहार या दोन्ही गोष्टी सांभाळायलाच पाहिजेत. पण हल्ली बऱ्याच लोकांना व्यायाम करायला वेळ नसतो.2 / 9त्यामुळे मग आहारावर अधिकाधिक भर द्यायला हवा. म्हणूनच व्यायाम करायचा नसेल किंवा व्यायामाला खरोखरच वेळ नसेल, पण वजन कमी करायचं असेल तर कमी कॅलरी आणि जास्त फायबर देणारे पदार्थ खायला पाहिजेत.3 / 9कमी कॅलरी आणि जास्त फायबर देणारे पदार्थ नेमके काेणते ते आता पाहूया... हे पदार्थ खाल्ल्यामुळे पोट लगेचच भरल्यासारखे वाटते. त्यामुळे मग सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही आणि वजन आपोआपच आटोक्यात राहण्यास मदत होते, अशी माहिती आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी healthshots.com ला दिली आहे.4 / 9यातला पहिला पदार्थ आहे बेरी प्रकारातली फळं. या फळांमध्ये व्हिटॅमिन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि डाएटरी फायबर भरपूर प्रमाणात असतात. 5 / 9ब्रोकोलीमधून फायबर तर मिळतातच. पण व्हिटॅमिन ए, के तसेच फोलेट भरपूर प्रमाणात मिळतात. 6 / 9१ कप शिजवलेलं गाजर खाल्लं तर त्यातून ३. ५ ग्रॅम फायबर मिळतात. तसेच गाजर हा बीटा कॅरेटिनचाही उत्तम स्त्रोत आहे.7 / 9पालकामधून लाेह, व्हिटॅमिन ए, के आणि फोलेट भरपूर प्रमाणात मिळते. तसेच पालक देखील कमी कॅलरी आणि जास्त फायबर देणारा पदार्थ म्हणून ओळखला जातो. 8 / 9१ कप कच्ची पत्ताकोबी खाल्ली तरी त्यातून २ ग्रॅम फायबर मिळते.9 / 9वजन कमी करणाऱ्यांनी काकडी खाणंही फायदेशीर ठरतं. कारण त्यातून भरपूर फायबर तर मिळतातच. पण शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications