Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene Advices To Avoid Eating These 5 Things In Breakfast
डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्त्याला ‘हे’ पदार्थ अजिबात खाऊ नका, तब्येत कायमची बिघडेल By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 1:59 PM1 / 7आपण सकाळच्या नाश्त्याला जे काही खातो त्यामुळे आपल्याला संपूर्ण दिवसाची उर्जा मिळते. सकाळच्या वेळी जर तब्येतीसाठी चांगल्या असलेल्या पदार्थांचे सेवन केले नाही तर तब्येत खराब होऊ शकते. नाश्त्याला चुकीचे, अन्हेल्दी पदार्थ खाणं लठ्ठपणा, पोटाचे आजार, हृदयाच्या आजारांचे कारण ठरू शकते. (Madhuri Dixit Husband Dr Shriram Nene Advices To Avoid Eating These 5 Things In Breakfast)2 / 7तब्येत चांगली राहण्यासाठी नाश्त्याला कोणत्या पदार्थ खाणं टाळायला हवं याबाबत माधुरी दीक्षित यांचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. नाश्त्याला कोणते पदार्थ खाऊ नयेत ते समजून घेऊ.3 / 7 व्हाईट ब्रेडमध्ये प्रोसेस्ड व्हाईट फ्लोअर असते ज्यामुळे नाश्ता अन्हेल्दी ठरतो. व्हाईट रोज नाश्त्याला खाल्ल्याने लठ्ठपणा, पोटाच्या समस्या, हृद्याचे आजार, डायबिटीस यांसारख्या समस्या वाढू शकतात. याव्यतिरिक्त ब्रेडमध्ये एडेड शुगरसुद्धा असते. जी आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. 4 / 7 याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. यात कार्बोहायडट्रेट्सचे प्रमाणही जास्त असते. सकाळच्या वेळी शुगरी सिरियल्स खाल्ल्याने हाय ब्लड लिपिड लेव्हल आणि हृदयाच्या समस्या वाढण्याचा धोका असतो. 5 / 7सकाळच्या नाश्त्याला रिकाम्या पोटी फ्रुट ज्यूस प्यायल्याने शुगर स्पाईक, डेंटल प्रोब्लेम्स, पचनाच्या समस्या उद्भवतात. ताजी फळं फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे. 6 / 7 सकाळच्या नाश्त्यात प्रोसेस्ड मीटचे सेवन करू नका. कारण असे पदार्थ नाश्त्याला खाल्ल्या हाय बीपी, हृदयाचे विकार, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.7 / 7 सकाळच्यावेळी दही खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. स्विडेंट योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियम असते. पण रिकाम्या पोटी खाल्ल्याने गुड बॅक्टेरियाजमुळे पोटाचे एसिडची पातळी कमी होऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications