Madhuri Dixit Husband dr shriram nene suggests 5 simple ways to make you meal healthy
रोज नाश्त्याला काय खाता? माधुरीचे पती डॉ. नेने सांगतात नाश्ता करण्याच्या ५ टिप्स- निरोगी राहाल By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 8:48 AM1 / 7धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने जगभरातील प्रसिद्ध डॉक्टरांपैकी एक आहे. डॉ. नेने कार्डिएक थोरेसिक एंड वॅस्कुलर सर्जन आहे. ते नेहमीच सोशल मीडियावर आरोग्याशी संबंधित माहिती शेअर करतात. 2 / 7आजकाल आपण टेस्टी जेवण खाण्याच्या नादात जेवणाच्या पोषण मुल्यांकडे दुर्लक्ष करतो. डॉ. नेनेंनी जेवणाला जास्त पौष्टीक बनवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. जेणेकरून आजारांचा धोका टाळता येईल.3 / 7डॉ. नेने सांगतात की, नाश्ता हा नेहमी पौष्टीक असावं. जेव्हा तुम्ही नाश्ता करता तेव्हा मोठ्या डिशमध्ये खाण्याऐवजी लहान प्लेट्सचा वापर करा. यामुळे ओव्हर इटींग टळेल तुम्ही योग्य प्रमाणात खाल.4 / 7नाश्ता किंवा जेवण फ्राय करण्याऐवजी बेक करा. कारण तुम्ही जितकं जेवण फ्राय कराल तेव्हढचं त्याची पौष्टीकता कमी होते. उच्च आचेवर फ्राय केलेल्या जेवणामुळे शरीराचं नुकसान होतं. कारण यामुळे फ्री रॅडिकल्स वाढतात. जे आजारांचे कारण ठरू शकतात.5 / 7नाश्त्याला अनेकजण ज्यूस पितात जे अजिबात चांगले नाही. ज्यूस पिण्याऐवजी ताजी फळं खायला हवीत. पल्पमध्ये फायबर्स असतात. फायबर्स आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याव्यतिरिक्त फायबर्समुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. 6 / 7इतर पेय पिण्याऐवजी जास्तीत जास्त पाणी प्या. पाणी प्यायल्यामुळे शरीर जास्तीत जास्त हायड्रेट राहतं. फ्रुट ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्सपेक्षा पाणी केव्हाही उत्तम ठरतं. 7 / 7नाश्ता पौष्टीक बनवण्यासाठी डॉ. श्रीराम नेने हे सल्ला देता की, ड्राई बेरीजऐवजी फ्रेश बेरीजचा आहारात समावेश करा. पॅकफूड खाणं टाळा. आणखी वाचा Subscribe to Notifications