शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'तू माझ्यासाठी जे काही केलंस..' धक धक गर्ल माधुरीच्या आईचं निधन; मायलेकींच्या खास आठवणी पाहा न पाहिलेले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 11:17 AM

1 / 8
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले. आईच्या जाण्यानं माधुरी आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माधुरीसाठी तिची आई सर्वकाही होती. (Madhuri Dixit's mother Snehlata Dixit passes away at 91)
2 / 8
माधुरीचा जन्म मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबात झाला. स्नेहलता आणि शंकर दीक्षित यांच्या लाडक्या लेकीनं अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
3 / 8
स्नेहलता दीक्षित या भेंडीबाझार घराण्यातील गायिका होत्या. गुलाब गँग या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी प्रथमच आवाज दिला होता.
4 / 8
गेल्या वर्षी, आईच्या 90 व्या वाढदिवसाच्या दिवशी, माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर एक प्रेमळ नोट लिहिली होती. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रत्येकजण म्हणतो की आई ही मुलीची सर्वात चांगली मैत्रीण आहे.
5 / 8
तू माझ्यासाठी जे काही केले आहेस, तू जे काही शिकवले आहेस ते माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. देव तुला चांगले आरोग्य देवो. तुला अधिक आनंदाच्या शुभेच्छा!' माधुरीने लिहिले.
6 / 8
मदर्स डे च्या दिवशी फोटो शेअर करताना माधुरीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी आज जी काही आहे आणि भविष्यात जी काही असेल, ती प्रत्येक गोष्ट तुझेच प्रतिबिंब असेल. मदर्स डेच्या शुभेच्छा.'
7 / 8
या पोस्टमध्ये माधुरी तिच्या दोन्ही बहिणींसह काळ्यात ड्रेसमध्ये दिसून आली.
8 / 8
अभिनेत्रीच्या एका बहिणीचे नाव रूपा आणि दुसऱ्या बहिणीचे नाव भारती आहे. चाहते आणि सेलिब्रिटींनी या फोटोवर कमेंट करून अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबावरचे प्रेम व्यक्त केले.
टॅग्स :Madhuri Dixitमाधुरी दिक्षितCelebrityसेलिब्रिटीbollywoodबॉलिवूड