शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वेटलॉस करायचा आणि त्वचेवर छान ग्लो देखील पाहिजे? रोज प्या 'मॅजिकल वॉटर'- बघा कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2024 5:33 PM

1 / 8
वजन एकदम आटोक्यात असणं आणि त्वचेवर छान चमक येणं, या दोन्ही गोष्टी कोणत्याही महिलेला पाहिजेच असतात. म्हणून आता या दोन्ही गोष्टी ज्यामुळे सहज साध्य होतील असा हा एक जादुई उपाय एकदा बघाच... (Magical water for glowing skin and weight loss)
2 / 8
हा उपाय नेमका काय आणि त्यासाठी काय करायचं याविषयीचा एक व्हिडिओ simratkathuria या इन्स्टाग्राम पेजवर एका आहारतज्ज्ञांनी शेअर केला आहे. (Home remedies for glowing skin)
3 / 8
यामध्ये त्या सांगतात की तुम्ही वारंवार गोड, तेलकट, तुपकट खाल्लं आणि त्या तुलनेत जर पाणी कमी प्यायलं, तर त्वचेवरची सगळी चमक जाणार आणि त्वचा डल दिसणार. शिवाय वजनही वाढणार (What to eat for effective weight loss). असं होऊ द्यायचं नसेल तर एक खास पाणी त्यांनी प्यायला सांगितलं आहे.
4 / 8
यासाठी साधारण दिड ते दोन लीटरची पाण्याची बाटली घ्या. त्यात आपलं नेहमीचं पिण्याचं पाणी टाका. आता या पाण्यामध्ये काही पदार्थ टाका. त्यातला सगळ्यात पहिला पदार्थ आहे पुदिना. पुदिन्याची १० ते १२ पानं टाका. यामुळे शरीरावरची सूज कमी होते, त्वचा स्वच्छ, नितळ होण्यास मदत होते.
5 / 8
यानंतर त्यात अर्धा टीस्पून ओवा टाका. ओव्यात असणाऱ्या ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्मांमुळे त्वचेवरचे ॲक्ने, पिंपल्स कमी होऊन त्वचा अधिक निरोगी होण्यास मदत होते.
6 / 8
त्याच पाण्यात १ टीस्पून चिया सीड्सही टाका. त्यातून शरीराला ओमेगा ३ फॅटी ॲसिड मिळते. त्यामाळे त्वचेतलं नॅचरल मॉईश्चर टिकून राहाते. तसेच त्वचा हायड्रेटेड राहून त्वचेवर ग्लो येतो.
7 / 8
या पाण्यात टाकण्याचा शेवटचा पदार्थ म्हणजे २ थेंब लेमन ऑईल. यामुळे या पाण्यातून तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळेल. त्यामुळे त्वचेवरचे हायपरपिगमेंटेशन कमी होऊन इव्हन स्किनटोन मिळण्यास मदत होते.
8 / 8
तहान लागली की हे असे सगळे पदार्थ टाकलेले पाणी प्या. यामुळे तहान तर भागवली जाईलच, पण अनेक पौष्टिक पदार्थ पोटात गेल्याने त्वचा आणि आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHome remedyहोम रेमेडीWaterपाणी