Maharashtrian street food vadapav named among best 20 sandwiches in the world
जगभरातल्या टॉप २० सॅण्डविचमध्ये वडापावने मारली बाजी!! पण काही खवय्ये मात्र नाराज.... कारण By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 5:02 PM1 / 5महाराष्ट्रातल्या स्ट्रिटफूडबाबत आपण जेव्हा बोलतो, तेव्हा वडापावला टाळून पुढे जाताच येत नाही. खरोखर लागलेली भूक असो, छोटीशी भूक असो किंवा मग टाईमपास म्हणून काहीतरी खायचं असो... स्वस्तात मस्तं आणि खमंग- चवदार पदार्थ म्हणजे वडापाव.2 / 5वडापावची लोकप्रियता आता थेट जगभरातच पोहोचली आहे. म्हणूनच तर tasteatlas यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये आपल्या मराठमोळ्या वडापावने बाजी मारली आहे.3 / 5tasteatlas यांनी जगभरातील प्रसिद्ध सॅण्डविचची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये जगभरात वेगवेगळ्या प्रांतात मिळणाऱ्या ५० प्रसिद्ध सॅण्डविचचा समावेश आहे. या यादीमध्ये १९ व्या स्थानावर वडापावचा उल्लेख असून त्याला ४. ३ रेटिंग मिळालं आहे. 4 / 5वडापावला अशी जागतिक स्तरावर ओळख मिळणे ही आनंदाचीच बाब आहे. पण तो काही सॅण्डविचचा प्रकार नाही. तो एक वेगळा आणि स्वतंत्र पदार्थ आहे, असं काही खवय्यांचं म्हणणं आहे. 5 / 5तुम्हाला काय वाटतं? वडापावला असं सॅण्डविच म्हणणं योग्य का? आणखी वाचा Subscribe to Notifications