Main symptoms of vitamin d deficiency, how to identify vitamin d deficiency
शरीरात ‘व्हिटामिन D’ची कमतरता आहे हे सांगणारी ५ लक्षणं, तुम्हाला होतोय त्रास? फ्रॅक्चर होण्यापूर्वी तपासा.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2024 9:10 AM1 / 6तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर तुमचे शरीर त्याबाबत सूचना देते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच कारण त्यातून भविष्यात अनेक गंभीर आजार मागे लागू शकतात. म्हणूनच पाहा ती लक्षणं नेमकी कोणती...2 / 6पहिलं लक्षण म्हणजे हाडं दुखणे, स्नायूंमध्ये नेहमीच वेदना होणे.. यामुळे अगदी उठता- बसतानाही त्रास होतो.3 / 6व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर डिप्रेशन आल्यासारखं होतं. विनाकारण चिडचिड होते आणि मानसिक स्वास्थ्य खराब होतं.4 / 6केस गळणं हे व्हिटॅमिन डी ची कमतरता सांगणारं एक प्रमुख लक्षण आहे.5 / 6व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीरावरील जखमा भरायला खूप वेळ लागतो.6 / 6व्हटॅमिन डी ची कमतरता असणाऱ्या लोकांना सर्दी, ताप असे इन्फेक्शन वारंवार होते. आणखी वाचा Subscribe to Notifications