शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केसांना फाटे का फुटतात? बघा कारणं आणि ३ सोपे उपाय, कोरडेपणा जाऊन केस होतील मऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 9:07 AM

1 / 5
केसांच्या लांबीच्या शेवटच्या भागात फाटे फुटून केस दुतोंडी होण्याची समस्या खूप जणांना जाणवते. यालाच काही भागांत केसांना उंदरी लागणं असंही म्हणतात. स्प्लिट हेअर किंवा दु मुहे बाल हा शब्द आपल्या परिचयाचा आहेच.
2 / 5
केसांमध्ये कोरडेपणा वाढला की केसांना फाटे फुटण्यास सुरुवात होते. आपण केसांना तेल लावून व्यवस्थित मॉईश्चराईज करण्यात कमी पडलो किंवा केसांना नेहमीच खूप हार्ड शाम्पू, कंडिशनर वापरत असू तर केसांना फाटे फुटतात. तुमच्या केसांचंही असंच झालं असेल तर हे काही घरगुती हेअरमास्क वापरून पाहा.
3 / 5
सगळ्यात सोपा आणि अतिशय परिणामकारक हेअरमास्क म्हणजे कोरफडीचा हेअरमास्क. हा हेअरमास्क तयार करण्यासाठी कोरफडीचा ताजा गर घ्या. तो मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये एक ते दिड चमचा एरंडेल तेल टाका. या मिश्रणाने केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर मालिश करा. आणि त्यानंतर साधारण १ तासाने केस धुवा. केस मऊ होतील.
4 / 5
फाटे फुटलेल्या केसांसाठी केळीचा हेअरमास्कही तुम्ही वापरू शकता. हा उपाय करण्यासाठी एका केळ घ्या. ते मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट करून घ्या. त्या पेस्टमध्ये थोडं एरंडेल तेल, थोडं कच्चं दूध आणि थोडा मध टाका. सगळे पदार्थ हलवून त्याचं चांगलं मिश्रण करून घ्या. हा हेअरमास्क केसांच्या मुळापासून ते लांबीपर्यंत लावा. अर्ध्या ते पाऊण तासाने केस धुवून घ्या.
5 / 5
दही आणि मध यांचं मिश्रणही कोरड्या केसांची तसेच फाटे फुटलेल्या केसांची समस्या कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजीHome remedyहोम रेमेडी