शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मकर संक्रात 2024 : नेहमी तेच तेच वाण कशाला? हळदी कुकूंवाला ५० रूपयांच्या आत द्या 'या' उपयोगी वस्तू; वाणाचे युनिक ऑपश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 11:35 AM

1 / 10
मकर संक्रातीनंतर (Makar Sankranti 2024) हळदी कुकंवाच्या (Haldi Kumkum) कार्यक्रमाला वाण म्हणून देण्यासाठी अनेक वस्तू असतात पण आयत्यावेळी काय आणावं ते सुचत नाही. नेहमी नेहमी त्याच वस्तू देण्यापेक्षा तुम्ही कमीत कमी किमतीत काही युनिक, हटके अशा उपयोगाच्या वस्तू दिल्या तर हळदी कुंकवासाठी घरी आलेल्या बायकाही खूश होतील. हळदी कुंकवासाठी ५० रूपयांच्या आत कोणते वाण घेता येतील ते पाहूया. (Gift Ideas For Haldi kumkum)
2 / 10
मोठी डिजाईन असलेली, फुलांची फिंगर रिंग तुम्ही देऊ शकता. अडजस्टेबल फिंगर रिंग असल्यास कोणीही सहज घालू शकेल. ३० ते ५० रूपयांच्या आत तुम्हाला उत्तम रिंग मिळेल.
3 / 10
मोबाईल स्टॅण्डचा वापर रोजच होतो. स्वंयपाक करताना झोपताना किंवा कोणतंही काम करताना फोन समोर ठेवून तुम्ही अगदी आरामात मोबाईलचा वापर करू शकता.
4 / 10
हात रूमाल प्रत्येकाच्या रोजच्या वापरात असतो. हळदी कुंकवासाठी वाण म्हणून तुम्ही वेगवेगळ्या डिजाईन्सचे रूमाल बायकांना देऊ शकता.
5 / 10
काजळ लावण्याची सवय अनेकांना असते. तुम्ही त्यांना या दोन्हीपैकी एक वस्तू वाण म्हणून देऊ शकता.
6 / 10
खास प्रसंगांना प्रत्येकजण दरवाज्यात किंवा तुळशीजवळ दिवे लावतो. दिव्याचे एक से एक पर्याय बाजारात उपलब्ध असतात. तुम्ही आपल्या पसंतीनुसार डिजाईन्सची निवड करून वाण म्हणून दिव्यांचा सेट देऊ शकता.
7 / 10
घरात डबे कितीही असले तरी कमीच पडतात. कारण कोणलाही वस्तू बांधून देताना किंवा खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी या डब्याचा वापर होतो. तुम्ही आपल्या आवडत्या रंगाचे समान आकाराचे डबे सर्वांना देऊ शकता.
8 / 10
हातात घालण्याचे कडे सर्वच महिलांना खूप आवडतात. २० रूपयांपासून ते ५० रूपयांपर्यंत तुम्हाला अडजस्टेबल कडे कोणत्याही दुकानात मिळतील. ज्वेलरीची महिलांना खूप आवडत असते. अशावेळी त्यांना हातातले दिल्यास आनंद होईल.
9 / 10
स्किन केअर साठी अनेक महिला पार्लरलला जाण्याचा कंटाळा करतात अशावेळी ते घरातच फेशियल किट किंवा स्क्रबचे पाकीट आणून चेहरा क्लिन करतात. तुम्ही स्क्रब किंवा डी टॅन पाऊच दिला तर प्रत्येकाला वापरता येईल.
10 / 10
चहा किंवा सरबत काहीही गाळण्यासाठी रोज गाळणीचा वापर होतो. तुम्ही हळदी कुंकवासाठी आलेल्या बायकांना चहाची गाळणी वाण म्हणून देऊ शकता.
टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीShoppingखरेदी