1 / 12१. संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे यंदा हळदी- कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून काेणती वस्तू लुटायची, याचा विचार करायला अनेक जणींनी सुरुवात केलीच असेल.2 / 12२. आपल्या बजेटमध्येही बसेल आणि उपयोगीही ठरेल, अशी वस्तू वाण म्हणून लुटण्याकडे अनेकींचा कल असतो. म्हणूनच अवघ्या १५ ते २० रुपयांत देता येतील, अशा या काही उपयोगी वस्तूंची यादी एकदा बघून घ्या. पाहा यापैकी तुम्हाला काही आवडतंय का..3 / 12 ३. मेहंदी कोन अवघ्या १० ते १५ रुपयांना येतात. शिवाय हौशीने अनेक जणी लावतातही. त्यामुळे मेहंदी कोन हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. कोनाच्या ऐवजी हर्बल मेहंदीही देऊ शकता. हर्बल मेहंदी केसांना लावण्यासाठी उपयुक्त ठरते.4 / 12४. साडी कव्हर घरी कितीही असले तरी ते कमीच पडतात. त्यामुळे साडी कव्हर देऊ शकता.5 / 12५. मोठे नॅपकीन किंवा हात रुमाल प्रत्येकीला किंवा प्रत्येकाच्या घरी लागतातच. त्यामुळे त्यांचाही विचार करून बघा.6 / 12६. रोज वापरण्याचे कानातले देऊ शकता. तुमच्या शहरातल्या लोकल मार्केटमध्ये १५ ते २० रुपयांत अनेक प्रकारचे कानातले मिळतील.7 / 12७. कानातल्यांप्रमाणेच केसांना लावण्याचे क्लचर, हेअरबॅण्ड, रबरबॅण्ड असे प्रकारही देऊ शकता.8 / 12८. वेट वाईप्सही प्रवासात, ऑफिसमध्ये वापरात येतात. त्यांचं छोटं पाकिट नक्कीच १५ ते २० रुपयांत मिळू शकतं.9 / 12९. बिस्किटचे पुडे किंवा शेंगदाणा चिक्की, तिळाचे लाडू यांचे छोटे पॅकही देऊ शकता. ते एक पौष्टिक वाण होऊ शकतं.10 / 12१०. १५ ते २० रुपयांत काही झाडांची रोपटीही मिळतात. त्याचाही विचार नक्की करा.11 / 12११. दोरवाती, फुलवाती प्रत्येकीला लागतातच. त्यांची पाकिटं दिली तर अनेकींचा वेळ वाचेल आणि तुमच्या वाणाचा लगेचच उपयोग होईल. यात तुम्ही उदबत्ती, धूप, कापूर यांचाही विचार करू शकता.12 / 12१२. आजकाल दारापुढे रांगोळी काढायला अनेकींना वेळ नसतो. त्यामुळे रेडिमेड रांगोळ्यांचे स्टिकर्स किंवा मग रांगोळीचे छापेही अनेकींसाठी उपयुक्त ठरू शकतात.