शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाळाच्या बोरन्हाणासाठी करा मायेनं डेकोरेशन, ६ सोप्या आयडिया-कमी वेळात घर सजेल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2024 12:15 PM

1 / 8
संक्रांत झाल्यानंतर घरोघरी हळदी- कुंकू कार्यक्रमाचा उत्साह दिसून येतो. ज्यांच्या घरी लहान बाळाची पहिली संक्रांत असेल, त्यांच्या घरी तर हळदी- कुंकू आणि बोरनहाण अशी दुहेरी धमाल असते.
2 / 8
बोहन्हाण कार्यक्रमाचा आनंद आणखी वाढविण्यासाठी डेकोरेशन कसं करावं, असा प्रश्न पडला असेल तर या काही मस्त आयडिया पाहा.. अशा पद्धतीने डेकोरेशन करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ आणि पैसे खर्च करण्याची मुळीच गरज नाही.
3 / 8
मागच्या बाजुने पिवळा किंवा तुमच्याकडे असणाऱ्या कोणत्याही रंगाचा पडदा लावा. त्यावर फुलांची अशी माळ सोडा आणि मधल्या भागात पतंग लावा. झटपट होणारं हे डेकोरेशन दिसायलाही छान आहे.
4 / 8
हे एक दिसायला सुंदर आणि करायला सोपं असं डेकोरेशन. असे पतंगाचे बॅकड्रॉप ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवता येतील.
5 / 8
हे आणखी एक सोपं डेकोरेशन. नुसते पतंग लावण्याऐवजी ते एकमेकांना जोडून त्याची माळ केली आहे आणि झेंडूच्या फुलांनी आजुबाजूला तसेच समोर सुंदर रांगोळी घातली आहे.(image credit-google)
6 / 8
मागे कोणतंही डेकोरेशन केलं तरी बाळाला बसण्यासाठी असं सुंदर कमळ करू शकता.
7 / 8
हे एक अतिशय सोपं, सुटसुटीत आणि खूप सुंदर वाटणारं डेकोरेशन पाहा. यामध्ये पतंगावर बोरं, गोळ्या, चॉकलेट चिटकवले आहेत. पतंग आणि मटक्याचे हे कटआऊट तुम्ही आधीही तयार करून ठेवू शकता.
8 / 8
जागा मोठी असेल तर हे असं सगळं पतंग आणि फुगे लावून छान डेकोरेशन करता येईल.
टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीkidsलहान मुलं