Makar Sankranti Special : Haldi Kumkum Gift Ideas for Haldi Kumkum Haldi kumkum Vaan Options
मकर संक्रात विशेष : हळदी कुंकवासाठी घ्या २० रूपयांपेक्षाही कमी किमतीत स्वस्त सुंदर वस्तूंचे पर्याय By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:09 PM1 / 9मकर संक्रातीच्या (Makar Sankranti 2024) सणानंतर घराघरातील स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. हळदी कुंकू या कार्यक्रमासाठी महिला आपल्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही घरी आमंत्रित करतात. अशावेळी वाण म्हणून काय द्यायंच असा प्रश्न पडू शकतो. हळदी कूंकवासाठी १० किंवा २० बायकांना तुम्ही वाण देणार असाल तर २० रूपयांच्या आत घेता येतील असे वाणाचे पर्याय पाहूया. (Haldi Kumkum Gift Ideas)2 / 9 हळदी कुकूंवाला तुम्ही बायकांना १० ते २० रूपयांत आकर्षक असे टिकलीचे पाकीट देऊ शकतात. प्लेन , खड्यांच्या किंवा चंद्रकोर टिकलीसुद्धा उत्तम पर्याय आहे.3 / 9 केसांना लावण्यासाठी प्रत्येकालचा रबर बॅण्ड वापरावे लागतात २० रूपयात तुम्हाला ५ ते ६ रबरबॅण्डचा छोटा सेट मिळेल या सेट तुम्ही घरी आलेल्या महिलांना देऊ शकता. 4 / 9 साबण रोजच्या वापरातील असल्यामुळे तुम्ही कोणालाही साबण दिलात तर त्यांना चांगले वाटू शकते. कपडे धुण्याचा किंवा भांडी धुण्याचा साबण दिल्यास त्यांचे काम अधिक सोपं होईल. १० ते २० रूपयात तुम्हाला कोणत्याही चांगल्या ब्रॅण्डचा साबण मिळेल5 / 9साडीवर किंवा ड्रेसवर सूट होतील असे आर्टिफिशियल कानातले तुम्ही हळदी कुकुंवासाठी देऊ शकता. फक्त १० ते २० रूपयांत तुम्हाला कानातले मिळतील. वेगवेगळ्या रंगाचे स्टोन असलेले कानातले तुम्ही घेऊ शकता. 6 / 9बाजारात हळदी कुकूंवाला देण्यासाठी बरेच कुंकवाचे कंरडे तुम्हाला १० रूपयांपासून ५० रूपयांपर्यंत उपलब्ध होतील. यात तुम्हाला हव्या तशा डिजाईन्सही मिळतील.7 / 9 गरजा लावायला सर्वांनाच आवडते. वाण म्हणून तुम्ही कधीही केसात लावता येईल असा आर्टिफिशियल फुलांचा गजरा किंवा केसांचा ब्रोच महिलांना गिफ्ट करू शकता. 8 / 9साड्या ठेवण्याासाठी प्लास्टीकचे साडी कव्हर तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. ज्याचा वापर नेहमीच केला जाईल. यामुळे कपाटात ठेवलेल्या साड्या खराब होत नाहीत.9 / 9 २० ते ३० रूपयांत तुम्हाला कापडी पिशव्या सहज मिळतील. आजकाल प्लास्टीकच्या पिशव्या कोणीच वापरत नाही. जर तुम्ही कापडी पिशव्या दिल्या तर अधिक वापरल्या जातील. आणखी वाचा Subscribe to Notifications