शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तोंडाला चव आणतात असे जगात भारी अस्सल मराठी पदार्थ! सांगा, तुम्हाला कोणता पदार्थ जास्त आवडतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2023 5:39 PM

1 / 8
मराठी पदार्थ म्हटले की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. करायला बरेच कष्ट लागणारी पण एक घास खाताच आहाहाहा...असा फिल देणारी पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्राची स्पेशल स्वीट डीश. होळीला आवर्जून केली जाणारी ही पुरणपोळी महाराष्ट्रीयन व्यक्तींबरोबरच जगभरातील लोकांना आवडते (Marathi Bhasha Gaurav Din Maharashtrian Recipes).
2 / 8
महाराष्ट्रातील दुसरे मिष्टान्न म्हणजे गणपती बाप्पाला आवडणारे मोदक. या मोदकांमध्ये बरेच प्रकार येत असले तरी उकडीच्या मोदकांची सर इतर कशालाच येणार नाही. कोकणात आवर्जून केला जाणारा हा बेत एकदा तरी खाऊन पाहायलाच हवा असा.
3 / 8
गोड पदार्थांबरोबरच विविध प्रकारच्या तिखट आणि झणझणीत पदार्थांचीही महाराष्ट्रात परंपरा आहे. मिसळ हा त्यातीलच एक जगात प्रसिद्ध असलेला आणि आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. मटकी किंवा कडधान्यांची उसळ, फरसाण आणि झणझणीत तर्री असलेली ही मिसळ अनेकांचा विक पॉईंट असते.
4 / 8
ठेचा हा असाच एक मराठी पारंपरिक पदार्थ. पूर्वी गरीबांचे अन्न म्हणून ओळख असलेला हा भाकरी आणि ठेचा आता मोठमोठ्या हॉटेलमध्ये आवर्जून खाल्ला जातो. जेवणाची लज्जत वाढवणारा हा ठेचा आजही ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही आवर्जून खाल्ला जातो.
5 / 8
पिठलं हा अस्सल मराठी अडीनडीला आणि घाईच्या वेळी केला जाणारा झकास पदार्थ. पोळी, भाकरी, भात अशा कशासोबतही खाता येणारं हे पिठलं करण्याच्या असंख्य पद्धती असून अगदी मैलामैलावर वेगवेगळ्या पद्धतीने हे पिठलं केलं जातं.
6 / 8
थालिपीठ ही अशीच खास महाराष्ट्रीयन रेसिपी. कित्येक धान्ये, डाळी, कडधान्ये भाजून त्याची केली जाणारी भाजणी आणि त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर घालून केले जाणारे खमंग थालिपीठ समोर आले की तोंडाला पाणी सुटल्यावाचून राहत नाही.
7 / 8
आंबोळी हा आणखी एक महाराष्ट्रीयन पदार्थ. नाश्त्याला झटपट होणाऱ्या या आंबोळी करायला जितक्या सोप्या तितक्याच त्या पचायला हलक्या असतात. तांदूळ आणि डाळींपासून केल्या जाणाऱ्या आंबोळी चवीलाही अतिशय मस्त लागतात.
8 / 8
भरली वांगी हा असाच महाराष्ट्रात केला जाणारा खास ग्रामीण पदार्थ. वांग्यांमध्ये दाण्याचा कूट, खोबरं, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला भरुन केली जाणारी आणि तेलावर परतलेली ही लुसलुशीत वांगी चवीला इतकी छान लागतात की हा बेत अगदी आवडीने फस्त केला जातो.
टॅग्स :foodअन्नMaharashtraमहाराष्ट्रRecipeपाककृती