शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लेकीला खांद्यावर घेऊन चालणारा रोहित आणि सोबत रितिका, वाचा रोहित - रीतिकाची खास लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2024 3:46 PM

1 / 10
क्रिकेट जगतातील 'हिटमॅन' कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करत इतिहास रचला (Rohit Sharma). अतिशय उत्तम खेळ करत भारताने हा सामना जिंकला (Ritika Sajdeh). या विजयामुळे फक्त भारतीय खेळाडूच नव्हे तर कोट्यावधी क्रिकेट चाहते भावूक झालेले दिसले (Couple Goals). मुख्य म्हणजे कर्णधार रोहित शर्माचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. स्टेडियममध्ये चाहते रोहितला चिअर तर करतातच, यासह रोहितची बायकोही फिंगर क्रॉस करून बसते. दरम्यान, रोहितची बायको अर्थात रितिका नक्की कोण? त्यांची प्रेम कहाणी कशी फुलत गेली? पाहूयात(Meet Ritika Sajdeh, Rohit Sharma’s wife – She is a successful sports manager handling multi-crore brand endorsements and contracts).
2 / 10
रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांचं नातं अत्यंत विशेष आणि सुंदर आहे. त्यांनी एकमेकांना नेहमी सपोर्ट दिला आहे. यश असो किंवा अपयश रितिका नेहमीच रोहितच्या पाठीशी उभी राहिली आहे. विजयावर आनंद व्यक्त करणे असो किंवा त्याच्या पराभवामध्ये त्याला धीर देणे, रितिकाने प्रत्येक काळात रोहितला सांभाळून घेतलं आहे.
3 / 10
जेव्हा रोहित शर्माने भारतासाठी टी-२० विश्वचषक जिंकला, तेव्हा त्याच्या पत्नीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. २०२३ सालच्या विश्वचषकात भारताला जेव्हा पराभव पत्करावा लागला तेव्हा रोहित खूप दुःखी झाला होता. त्यावेळी रितिका त्याच्यासोबत होती आणि त्याला धीर देत होती. सुख असो किंवा दुख रीतीकाने रोहितला कायम सपोर्ट केलं आहे. मोटीवेट केलं आहे.
4 / 10
एक चांगली पत्नी आपल्या नवऱ्याच्या करिअरच्या आव्हानांना समजून घेते, आणि आव्हानांना सामोरे जाण्यास बळ देते. रितिकाने आदर्श पत्नी कशी असते हे कायम दाखवून दिलं आहे.
5 / 10
रोहित-रितिकाचे अनेक वर्षे अफेयर होते पण त्यांनी जाणीवपूर्वक ते समोर येऊ दिले नाही असे सांगितले जाते. ही जोडी पहिल्‍यांदा वर्ल्ड कप- २०१५ च्या दरम्यान दिसली होती. त्‍यावेळी रितिका मिस्ट्री गर्ल नावाने प्रसिद्ध झालेली होती.
6 / 10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही पहिल्यांदा एका जाहिरातीच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
7 / 10
रोहितने रीतीकाला फिल्मी स्टाईल प्रपोज केलं होतं. मुंबईतील बोरिवली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर रोहित शर्माने रितिका सजदेहला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. याच मैदानावर हिटमॅनने क्रिकेटची कला शिकली. नंतर दोघांनी १५ डिसेंबर २०१५ रोजी लग्न केले.
8 / 10
रितिकाचा जन्म २१ डिसेंबर १९८७ साली मुंबईत झाला. ती क्रीडा व्यवस्थापक आहे. रितिकाची एकूण संपत्ती १ मिलियन वरून ५ मिलियन झाली आहे. रितिका सजदेहने विराट कोहलीसोबत स्पोर्ट्स मॅनेजर म्हणूनही काम केले आहे. पण सध्या ती तिच्या पतीची स्पोर्ट्स मॅनेजर आहे.
9 / 10
रितिका सजदेहला कुणाल नावाचा मोठा भाऊ आहे. तिचा एक चुलत भाऊ बंटी असून त्याची कॉर्नरस्टोन स्पोर्ट अँड एंटरटेनमेंट नावाची स्वतःची कंपनी आहे. रितिकाने तिच्या चुलत भावाच्या कंपनीत अनेक क्रीडा व्यक्तींसोबत काम केले आहे.
10 / 10
लग्नाच्या ३ वर्षानंतर म्हणजेच २०१८ साली पालक झाले. त्यांना कन्यारत्न प्राप्त झाली. त्यांच्या मुलीचे नाव समायरा आहे.
टॅग्स :Rohit Sharmaरोहित शर्माT20 World Cupट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप