शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीत मेहंदी काढायची तर पाहा एक से एक युनिक डिझाईन्स; परंपरा जपत मिळेल वेस्टर्न लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2023 4:39 PM

1 / 10
कोणताही सण आला की हातावर मेहंदी काढल्यावर एकदम सजल्याचा आणि पारंपरिक लूक येतो. त्यामुळे नागपंचमीपासून सुरु होणाऱ्या बहुतांश सणांना आपल्याकडे महिला आवडीने मेहंदी काढतात. दिवाळी हे त्यातलेच एक महत्त्वाचे निमित्त (Mehendi Designs for Diwali Festival)...
2 / 10
थोडा वेस्टर्न लूक हवा असेल आणि पारंपरिक मेहंदी नको असेल तर हाताच्या एका बाजूला थोडी डिझाईन काढून असा वेलीचा किंवा जोडल्याचा फिल मेहंदीला नक्की देता येतो.
3 / 10
हल्ली अशाप्रकारे बोटांवर आणि एखाद्या कॉर्नरला छोटीशी डीझाईन काढण्याचीही फॅशन खूप इन आहे. यामुळे खूप भरगच्च मेहंदी काढली जात नाही आणि तरीही मेहंदी काढल्याचे समाधान मिळते.
4 / 10
कमीत कमी वेळात आणि कमी एनर्जी घालवून हाताच्या पुढच्या किंवा मागच्या बाजूला सुबक मेहंदी काढायची असेल तर अशी १ किंवा २ डीझाईन्स नक्की करुन त्याचेच रिपिटेशन केले तरी छान दिसते.
5 / 10
सुटसुटीत आणि तरीही सुबक अशी मेहंदी काढायची असेल तर अशाप्रकारच्या डिझाईन्सचा तुम्ही नक्कीच विचार करु शकता. मधे बरीच गॅप असली तरीही हात लांब असेल तर ते दिसायला फार छान दिसते.
6 / 10
मेहंदीची जाळी हा पॅटर्न जुना असला तरीही तो कायम फॅशनमध्ये असतो. या जाळीचे बरेच प्रकार आपल्याला करता येतात. यासाठी बोटांवर आणि खाली एक डिझाईन नक्की करुन मध्यभागी जाळी काढता येते.
7 / 10
पारंपरिक भरगच्च मेहंदी आवडत असेल तर त्यात नेहमीचे चक्र, कोयरी, पानाचा आणि मोराचा आकार असे बरेच काही काढून हातभर मेहंदी काढता येते.
8 / 10
पारंपरिक भरगच्च मेहंदी आवडत असेल तर त्यात नेहमीचे चक्र, कोयरी, पानाचा आणि मोराचा आकार असे बरेच काही काढून हातभर मेहंदी काढता येते.
9 / 10
अरेबिक मेहंदीचे फॅड गेल्या काही वर्षात वाढले असून कमीत कमी वेळात, कमी कष्टात आणि तरीही हातभर वाटेल अशी ही मेहंदी बऱ्याच मुली, महिला आवडीने काढून घेतात.
10 / 10
पारंपरिक आणि अरेबिक मेहंदीचे कॉम्बिनेशन असलेला हा नवा प्रकार काढला तर तुम्हाला पारंपरिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही कपड्यांवर हा लूक कॅरी करता येऊ शकतो.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Beauty Tipsब्यूटी टिप्सMakeup Tipsमेकअप टिप्स