Milind Soman Diet Plan Milind Soman Fitness Secret : Milind Soman Diet Habits And Fitness Secret
पन्नाशीतही फिट आणि तरुण दिसायचंय? पाहा मिलिंद सोमणचा खास डाएट प्लॅन, कायम पंचविशीतले दिसाल By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 8:39 AM1 / 9अभिनेते मिलिंद सोमण वयाच्या ५८ व्या वर्षीही एखाद्या पंचविशीतल्या तरूणाप्रमाणे दिसतात. त्यांचा स्टॅमिना आणि पर्सनॅलिटीपाहून सर्वांनाच आकर्षण वाटते. (Milind Soman Diet Plan Milind Soman Fitness Secret)2 / 9फिटनेस मॉडेल मिलिंद सोमण दिवसाची सुरूवात ५ किंवा ५:३० वाजता करतात. रूम टेंम्परेचरवर असलेले ५०० मिलीलिटर पाणी मिलिंद पितात.3 / 9मिलिंद सकाळच्या नाश्त्यात नट्स, पपई, खरबूज व्यतिरिक्त इतर हंगमी फळांचा समावेश करतात. त्याला ड्रायफ्रुट्स खायलाही आवडतात.4 / 9मिलिंद दुपारी २ वाजता जेवतात. जेवणात सिजनल भाज्या, डाळ, खिचडी, भात खाणं पसंत करतात. त्यांच्या जेवणात वरण-भात आणि देशी तुपाचा समावेश असतो.5 / 9तीन तासांच्या गॅपनंतर मिलिंद संध्याकाळी ५ वाजता ब्लॅक टी पितात. त्यानंतर डीनर करतात.6 / 9मिलिंद संध्याकाळी ७:३० च्या आधी रात्रीचं जेवण करतात. डिनरमध्ये हलके फुलके पदार्थ असतात.7 / 9रात्रीच्या जेवणात एक प्लेट भाजी आणि खिचडी असते. खिचडी त्यांना रात्रीच्या जेवणात फार आवडते.8 / 9झोपण्याआधी १ ग्लास गरम पाण्यात हळद मिसळून गुळासोबत घेतात.9 / 9मिलिंज रोज न चुकता धावण्याचा व्यायाम करतात. ज्यामुळे त्यांचे शरीर एक्टिव्ह राहण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications