Mint Moringa Coriander Chia Seeds Raw Mango Chutney Is Called Power House OF Good Cholesterol
गुड कोलेस्टेरॉलची पॉवरहाऊस आहे 'ही' चटणी; रोज १ चमचा खा, हृदय राहील निरोगी By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 1:50 PM1 / 8आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत कोलेस्टेरॉल आणि बीपी वाढण्याचा त्रास अनेकांना होतो. नेहमी तेलकट पदार्थ खाल्ल्याने, वेळेवर न जेवल्यानं शरीरात कोलेस्टेरॉल वाढू लागतं. जेव्हा शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढू लागते तेव्हा गुड कोलेस्टेरॉल आपोआप कमी होऊ लागते. 2 / 8गुड कोलेस्टेरॉल जेव्हा शरीरात जास्त असते तेव्हा घाणेरडं कोलेस्टेरॉल वितळून पुन्हा लिव्हरमध्ये जाते आणि विष्ठेच्या माध्यमातून बाहेर निघते. 3 / 8जर शरीराच्या आर्टरीज आणि नसांमध्ये घाणेरडं कोलेस्टेरॉल जमा झालं असेल तर चांगलं कोलेस्टेरॉल वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा. 4 / 8 रोजच्या जेवणात चविष्ट चटणीचा समावेश करू शकता. ज्यामुळे नसा आणि आर्टरीज स्वच्छ राहतील आणि गुड कोलेस्टेरॉल वाढेल.5 / 8यासाठी आहारात पुदिना, धणे, लसूण, लिंबू, आंबा, चिया सिड्स आणि फ्लेक्स सिड्स घ्यायला हवेत.6 / 8हे सर्व पदार्थ काळं मीठ घालून दळून घ्या. ही चटणी तुम्ही पाण्यात मिसळून खाऊ शकता.7 / 8तुम्ही यात शेवग्याची पानं घालू शकता. ही चटणी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. 8 / 8ही चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम आहे. तसंच तब्येतीसाठीही उत्तम आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications