शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वजन वाढतंच नाही, लुकडी म्हणून लोक चिडवतात? भातासोबत खा ६ पदार्थ, वजन वाढेल लवकर आणि व्हाल फिट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 9:00 AM

1 / 7
'भात' हा आपल्या रोजच्या जेवणातल्या मुख्य पदार्थांपैकी एक आहे. काहीजणांना जेवणात भात हा लागतोच. भाताशिवाय जेवण म्हणजे अधुरेच वाटते. काहीवेळेस चपात्या करायचा कंटाळा आला की, आपण आवडीने भात खातो. भाताचे अनेक प्रकार करता येतात. पुलाव भात, मसाले भात, जिरा राईस असे असंख्य प्रकार भाताचे करता येतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण भात खाणं सोडतात तर काहीजण वजन वाढवण्यासाठी भात खातात. वजन वाढवण्यासाठी भात खाताना आपण त्यात अनेक पदार्थ मिक्स करुन खाऊ शकतो. भातात शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक तर असतात परंतु या भातात आपण अनेक पदार्थ मिक्स करुन त्याची पौष्टिकता अधिक वाढवू शकतो. वजन वाढवण्यासाठी तुम्ही भातासोबत काही पदार्थ खाऊन तुमचा आहार अधिक पोषक बनवू शकता. यामुळे तुमचे वजन वाढवण्यास मदत होईल शिवाय तुम्हाला दिवसभरासाठी लागणारी एनर्जी देखील मिळेल. त्यामुळे भातासोबत नेमके कोणते पदार्थ खावेत हे पाहूयात (Mix these 6 protein rich foods in rice to increase body power and weight gain).
2 / 7
डाळींमध्ये प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात जे वजन वाढण्यास मदत करतात. भातामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी मिक्स करुन खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते. भात तयार करताना त्यात इतर डाळी घालून खिचडी बनवली, तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
3 / 7
तूप किंवा तेलामध्ये कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. भात तयार करताना त्यात थोडे तूप किंवा तेल घालू शकता.
4 / 7
पनीरमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असते जे स्नायू मजबूत करण्यास मदत करतात. यासाठी आपण पनीर पराठा किंवा पनीर पुलाव बनवू शकता.
5 / 7
बदाम, काजू, मनुका यांसारख्या ड्रायफ्रुट्समध्ये, प्रोटीन, फॅट आणि फायबर असतात जे वजन वाढवण्यास मदत करतात. तुम्ही भातामध्ये ड्रायफ्रुट्स मिक्स करुन खाऊ शकता.
6 / 7
दह्यात प्रोटीन्स आणि प्रोबायोटिक्स असतात जे पचन सुधारण्यात फायदेशीर ठरतात. आपण दही भातामध्ये मिक्स करुन खाऊ शकता किंवा भात डाळ खाताना तोंडी लावायला म्हणून दही घेऊ शकता. यामुळे वजन वाढण्यासोबतच अनेक पोषक घटक आपल्या आरोग्यास मिळतात.
7 / 7
भात हा भाज्यांसोबत खाल्ला तर आपल्याला याचे अनेक फायदे होतात. भात नुसता उकळून आणि भाज्यांसोबत खाल्ल्याने आपल्या शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक घटक मिळतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स