Morning Mantra Gud Chana Khane ke Fayde Weakmess and lethargy
थकल्यासारखं होतं, अशक्तपणा आला? उठल्यानंतर १ तासाच्या आत करा हा नाश्ता, फिट-मेंटेन राहाल By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 2:36 PM1 / 6ऊन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येकालचा थकवा जाणवतो. काही लोकांना चक्करसुद्धा येते. अशा लोकांनी सकाळी उठल्यानंतर एक तासाच्या आता नाश्ता करून घ्यायला हवा. न्याहारीसाठी, तुम्ही उच्च फायबर आणि प्रथिने समृद्ध हे अन्न संयोजन खावे. 2 / 6काळे चणे आणि गुळ नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.. तुम्हाला फक्त गूळ, चणे सकाळी रिकाम्या पोटी खावे लागेल. असे काही दिवस सतत केल्याने तुम्हाला उर्जा मिळेल आणि अशक्तपणाची समस्या दूर होईल. 3 / 6सगळ्यात आधी रात्री काळे चणे भिजवायला ठेवा. सगळी उठल्यानंतर २ मूठ चणे धुवून एका वाटीत ठेवा. ही वाटी धुवून एका भांड्यात ठेवा. गुळ तोडून त्यात चणे मिसळा. नंतर आरामात बसून चणे आणि गुळाचे सेवन करा. चणे, गूळ खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतील.4 / 6चणे आणि गुळातच फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. याशिवाय यात कॅल्शियमही मोठ्या प्रमाणात असते. गुळाने रक्त वाढवण्यास मदत होते. स्टॅमिना बुस्ट होतो आणि तब्येतही चांगली राहते. 5 / 6काळ्या चण्याच्यांच्या सेवनाने शरीराला प्रोटीन्सची कमतरता भरून निघण्यास मदत होईल आणि तुम्ही मेंटेन राहाल.6 / 6तसेच गूळ आणि चण्यांचे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी वरदान आहे. रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा. आणखी वाचा Subscribe to Notifications