Mumbai's famous Vada Pav ranked as world's 13th best sandwich
जगभरातल्या सर्वोत्तम सँडविचच्या यादीत ‘वडापाव’ने मारली बाजी; खमंग झणझणीत वडापावच्या चवीची कमाल... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2023 3:14 PM1 / 9 मुंबई आणि वडापाव यांचे एक प्रकारचे अतूट नाते आहे. मुंबई शहरात वडापाव खाणाऱ्या शौकिनांची संख्या प्रचंड आहे. मुंबईबाहेरील व्यक्ती मुंबईमध्ये आल्यावर हमखास वडापाव खातो. 'वडापाव' हा मुंबईकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे. मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्ट्रीट फूडमध्ये वडापाव प्रथम क्रमांकावर आहे(Mumbai's famous Vada Pav ranked as world's 13th best sandwich).2 / 9मुंबई किंवा इतर काही भागांपुरताच मर्यादित असलेला वडापाव हळुहळु राज्यासह देशभरात लोकप्रिय होऊ लागला आहे. या वडापाव संदर्भात मुंबईकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट समोर आली आहे. मुंबईचा आवडता पदार्थ समजल्या जाणाऱ्या वडापावला आता जागतिक स्तरांवर मान्यता मिळाली आहे. 3 / 9जगभरातील पारंपारिक खाद्यपदार्थांसाठी टेस्टॲटलास (TasteAtlas) नावाचे एक फूड ट्रॅव्हल गाईड (Experiential Travel Guide) आहे. टेस्ट ॲटलस (Taste Atlas) ही फूड ट्रॅव्हल गाईड वेबसाईट आहे. यामध्ये जगभरातील पारंपारिक खाद्यपदार्थांसाठी मार्गदर्शक माहिती प्रसिद्ध केली जाते. यावर जगभरातील विविध पाककृती आणि लोकप्रिय पदार्थ याबाबत माहिती दिली जाते. आता टेस्टॲटलासने (TasteAtlas) जगातील सर्वोत्तम ५० सँडविच'च्या यादीमध्ये वडापावला स्थान दिले आहे. या यादीमध्ये मुंबई किंवा महाराष्ट्रातील वडापाव चक्क १३ व्या क्रमांकावर आहे, जे एक उत्तम जागतिक रँकिंग मानले जाते. 4 / 9या यादीमध्ये तुर्कीचा टॉम्बिक प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर दक्षिण अमेरिकेतील पेरूचा बुटीफारा आणि तिसरा क्रमांक अर्जेंटिनाचा सँडविच डी लोमोला मिळाला आहे. या यादीमध्ये केवळ दोन शाकाहारी सँडविचचा समावेश आहे. ज्यातील एक आहे अवाकाडो टोस्ट आणि दुसरा म्हणजे वडापाव.5 / 9वडापावचा जन्म १९६६ साली दादर स्टेशन बाहेरील अशोक वैद्य यांच्या खाद्यगाडीवर झाला. याच दरम्यान, दादर मधील सुधाकर म्हात्रे यांनी वडापावची सुरुवात केली. १९७० ते १९८० च्या काळात मुंबईमध्ये मिल बंद झाल्या. त्यानंतर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या. त्यानंतर मुंबईच्या गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसू लागल्या.6 / 9 मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. मुंबईकरांचे आणि वडापावचे नाते अगदी वेगळेच आहे. आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव. आपण कोणत्याही वेळी वडापावचा आस्वाद घेऊ शकता. चहा, नाश्ता असो किंवा जेवण आपण कधीही वडापाव खाऊ शकता. अगदी रस्त्यावर राहणारा व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती वडापाव सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. अशा या मुंबईच्या वडापावला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. जगातील ५० सर्वोत्कृष्ट सँडविचच्या यादीत वडापावला स्थान मिळालं आहे.7 / 9एक पाव त्यामध्ये गरमागरम तेलातून काढलेला, कुरकुरीत आणि चविष्ट असलेला वडा त्यावर हलकीशी लसणाची चटणी तसेच तिखट चटणी आणि मिरचीबरोबर वडापावचा घास जेव्हा तोंडात जातो, तेव्हा अर्थातच त्याची चव जीभेवर रेंगाळल्याशिवाय राहात नाही.8 / 9वडापाव हा स्मॅश केलेले बटाटे वापरून बनवला जातो. बटाट्यामध्ये मसाले, मीठ, मिरची घालून तो चण्याच्या पिठात बुडवून तळतात. मुंबईमध्ये वडापाव लसणाची लाल कोरडी चटणी, कांदा, लिंबू, तळलेली मिर्ची अशा गोष्टींसोबत सर्व्ह केला जातो.9 / 9 मुंबईतील भुकेलेल्यांना पोट भरुन तृप्त करण्यासाठी, परवडणारी आणि तयार करण्यास सोपी डिश याच विचारातून वडापावचा जन्म झाला. आता हा वडापाव जगभरात नाव कमावत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications