शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऐन नवरात्रीत ५ महिलांची राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर; असा झाला त्यांच्या कार्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2023 5:43 PM

1 / 8
६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची घोषणा ऑगस्ट महिन्यात करण्यात आली होती आणि नुकतेच या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले (National Film Awards 2023 women winners Navratri Special ).
2 / 8
यामध्ये ५ महिलांनी मोहोर उमटवली असून ऐन नवरात्रीत नारी शक्तीचा गौरव करण्यात आला आहे. योगायोग म्हणजे यंदा राष्ट्रपतीपदीही महिलाच असल्याने द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
3 / 8
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट हिला गंगूबाई काठियावाडी या तिच्या गाजलेल्या चित्रपटातील गंगूबाईच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. या सोहळ्यासाठी आलियाने तिच्या लग्नातील साडी नेसल्याचीही बरीच चर्चाही झाली.
4 / 8
तर मिमी या चित्रपटासाठी क्रिती सेनन हिलाही सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यावेळी क्रितीही पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये अतिशय ग्रेसफूल दिसत होती.
5 / 8
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यावर्षी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. वयाच्या ८५ व्या वर्षीही वहिदा यांच्या चेहऱ्यावरील ग्रेस आजही कायम असल्याचे आपल्याला या पुरस्कार सोहळ्यादरम्यान पाहायला मिळाले.
6 / 8
मराठी अभिनेत्री असलेली पल्लवी जोशी हिला द काश्मिर फाईल्स या चित्रपटासाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मराठी अभिनेत्रीने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मोहोर उमटवल्यामुळे तिच्यावर मराठी चित्रपटसृष्टीतूनही अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
7 / 8
इराविन निजाल या तमिळ भाषेतील चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्तम महिला पार्श्वगायिका या विभागात श्रेया घोषाल हिने पुरस्कार पटकावला. श्रेया आपल्या सुमधुर आवाजाने नेहमीच रसिकांना मंत्रमुग्ध करत असते. त्यामुळे या पुरस्काराच्या रुपाने तिच्या कलेच्या उपासनेला चार चा़ंद लावले असे म्हणायला हरकत नाही.
8 / 8
बॉलिवूडमधील आलिया आणि रणबीर या प्रसिद्ध जोडप्याने सोहळ्याच्या दरम्यान सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. आपल्या बायकोचे कौतुक पाहण्यासाठी रणबीर अतिशय उत्साहाने या सोहळ्यासाठी तिच्यासोबत उपस्थित होता.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीNational Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारWomenमहिला