शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लेकीची माया आभाळाएवढी! लाडक्या लेकींसाठी आईबाबांची खास पोस्ट, नेते-अभिनेतेही झाले इमोशनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2024 4:59 PM

1 / 8
भारतात दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी भारतात १६ वा राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येत आहे. पण भारतात २४ जानेवारीलाच राष्ट्रीय बालिका दिन साजरा का करण्यात येतो? याबद्दलची माहिती कमी लोकांना ठाऊक आहे(National Girl Child Day: ministers, celebrities share photos with daughters on social media).
2 / 8
बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त, दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो. मुलींना समाजात भेडासवणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्याकरिता, यासह निराकरण करण्याकरीता, २००८ साली देशाच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राष्ट्रीय बालिका दिन सुरू केला होता. यादिवशी अनेक शाळा-महाविद्यालय, संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासह जनजागृती पसरवली जाते. या दिवशी बरेचसे दिग्गच सोशल मिडीयावर जनजागृती पसरवतात.
3 / 8
बॉलीवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देत, नाती आराध्या आणि नव्या यांना हृदयस्पर्शी पत्र लिहिले होते. यात त्यांनी, 'लोकांच्या निर्णयाच्या छायेत जगू नका. तुमच्या स्कर्टच्या लांबीवरून, चारित्र्याचे मोजमाप काढण्यास लोकांना कधीच संधी देऊ नका. लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका.'
4 / 8
‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री समीरा रेड्डी सोशल मिडीयावर कायम सक्रीय असते. त्यांनी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी 'घरात मुलींचा मान राखला पाहिजे. मुलगा आणि मुलगीमध्ये कोणताही भेदभाव झाला नाही पाहिजे. सगळ्या गोष्टीत समानता असायला हवी.'
5 / 8
अभिनेता आणि होस्ट अपारशक्ती खुराणा याने देखील मुलीसाठी खास पोस्ट शेअर केली. 'तू कितीही मोठी झालीस, तरी बाबांसाठी माझी लहान लेकरू राहशील.'
6 / 8
अमेरिकन अॅक्टर विल स्मिथ आपल्या मुलीबद्दल बोलताना म्हणाले, 'बरेचसे पालक आपल्या मुलांवर कण्ट्रोल ठेवतात. बऱ्याच गोष्टी लादतात. जे चुकीचे आहे. जर मी माझ्या मुलीवर अनेक गोष्टी लादत गेलो तर, कदाचित मोठी झाल्यानंतर ती मला सोडून आपला पार्टनर निवडून राहू शकते.'
7 / 8
नेहा धुपिया आपल्या मुलीबद्दल बोलताना म्हणाली, 'माझ्या मुलीला केव्हा 'बस' आणि केव्हा 'नाही' म्हणायचे हे शिकवणार आहे. कारण बऱ्याचशा मुलींना नाही म्हणायला जमत नाही. समोरच्या व्यक्तीचं मन दुखवले जाणार नाही याची काळजी घेतात. पण जर तिला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर, तिला नाही म्हणता यायला हवे.'
8 / 8
आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या मुलीकडून पालकत्व शिकले असल्याचे म्हटले आहे. भाषणावेळी तांबे म्हणतात, 'माझी मुलगी ८ वर्षांची आहे. तिला कधी शेफ, साइंटिस्ट किंवा डॉक्टर बनण्याची इच्छा होते. वय वाढलं की तिचे स्वप्नही बदलतात. पुढील १० वर्षात तिला आणखीन काहीतरी बनण्याची इच्छा होईल. पण पालक म्हणून आपण त्यांना हतोत्साहित करणे टाळावे. मुलांच्या इच्छेनुसार त्यांना करिअर निवडण्याची मुभा द्या. जेव्हा मुलं सक्षम होतील, तेव्हा मार्गदर्शन द्या.'
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAmitabh Bachchanअमिताभ बच्चनSatyajit Tambeसत्यजित तांबेSameera Reddyसमीरा रेड्डीNeha Dhupiaनेहा धुपियाAparshakti Khuranaअपारशक्ती खुराना