Navaratri special fast recipe, 5 Quick dishes for haldi kunku function in navaratri
नवरात्रीत हळदी- कुंकू, कुमारिका पुजनाला येणाऱ्यांना काय फराळ द्यायचा? बघा झटपट देता येतील असे ५ पदार्थ By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2023 12:38 PM1 / 8नवरात्रीत महिलांच्या उत्साहाला अगदी उधाण आलेले असते. त्यामुळे मग हळदी- कुंकू, कुंकूमार्चन, कुमारिका पुजन असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतले जातात. मग त्यानिमित्ताने घरी आलेल्या महिलांना किंवा कुमारिकांना काय फराळ द्यावा, ते कळत नाही.2 / 8अशावेळी बाकीच्या कामांचीही खूप गडबड असते. शिवाय फराळ करायला आणि तो सर्व्ह करायलाही खूप कमी वेळ असतो. म्हणूनच आता असे काही पदार्थ बघा जे झटपट करता येतील शिवाय सर्व्ह करायलाही त्रास होणार नाही. 3 / 8नवरात्रीत बऱ्याच जणींना उपवास असतो. त्यामुळे घरी येणाऱ्यांसाठी उपवासाचेच पदार्थ ठेवा. त्यामुळे उपवास नसणाऱ्यांसाठी आणि उपवास असणाऱ्यांसाठी दोन वेगवेगळे पदार्थ करण्याची गरज नाही. 4 / 8साबुदाण्याची खिचडी करून ठेवली तर तुम्ही ती चटकन मायक्रोवेव्हमध्ये किंवा कढईमध्ये गरम करू शकता. खिचडीसोबत एखादी शेंगदाण्याची विकतची चिक्की आणून ठेवा.5 / 8फ्रुट सलाड हा पदार्थही तुम्ही करू शकता. फळं चिरण्याची थोडी मेहनत सुरुवातीला घ्यावी लागते. पण सर्व्हिंगला हा पदार्थ सोपा आहे, शिवाय सगळ्यांना आवडतोही. त्याच्यासाेबत थोडा सुकामेवाही देऊ शकता...6 / 8फ्रुट सलाड करायचं नसेल तर नुसतीच वेगवेगळी फळं असणारी फ्रुट प्लेटही तुम्ही देऊ शकता. यामध्ये चिरायला सोपी अशी वेगवेगळी फळं आणून कापून ठेवा. फक्त सगळी कामं झाल्यावर सगळ्यात शेवटी फळं चिरा. कारण चिरलेली फळं शक्य तेवढ्या लवकर खावीत.7 / 8दूध आटवून केलेली बासुंदी आणि सोबतीला थोडे चिप्स, उपवासाचा चिवडा, केळी असा नाश्ताही देऊ शकता. बासुंदी करायला खूप मेहनतही लागत नाही, शिवाय ती करण्यासाठी वेगळा वेळही काढावा लागत नाही. 8 / 8उपवासाचा चिवडा, चिप्स, राजगिऱ्याची वडी, शेंगदाण्याचा लाडू किंवा चिक्की असे सगळे पदार्थ विकत आणूनही तुम्ही देऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications