Navratri 2022: Indo Western look for dandiya, rock this dandiya season with fashionable look
Navratri 2022: दांडियासाठी करा खास इंडो- वेस्टर्न लूक! नेहमीच्या ट्रॅडिशनल ड्रेसिंगपेक्षा काहीतरी वेगळं- हटके... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 9:01 PM1 / 9१. यंदाच्या नवरात्रीमध्ये दांडिया खेळण्याची तयारी सुरू झाली असेलच.. किती दिवस दांडिया खेळायला जायचे, कोणत्या दिवशी कसे ड्रेसिंग करायचे, हे सगळं तर ठरलेलं असेलच. नेहमी तोच तो प्रकारचा ट्रॅडिशनल लूक करण्यापेक्षा यंदा असा काही वेगळा, स्टायलिश लूक करून बघा.2 / 9२. पारंपरिक लेहेंगा, घागरा असे कपडे घालून दांडिया खेळण्याची मजा काही वेगळीच असते, त्यात वादच नाही. पण कधी कधी असा हटके लूकही करता येतो.3 / 9३. ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा तुमच्या शहरातील लोकल मार्केटमध्येही आजकाल इंडो- वेस्टर्न प्रकारात मोडणारे अनेक ड्रेस मिळतात. अशा पद्धतीचे ड्रेस नक्कीच अधिक कॅची दिसतील. 4 / 9४. आजकाल जीन्सवर पण आरशाचे, वर्क असणारे टॉप घालून दांडिया खेळण्याची फॅशन आहे. अशावेळी असा लूक शोभून दिसतो.5 / 9५. आपल्या नेहमीच्या जीन्सवर अशा पद्धतीने दांडिया स्पेशल टॉप तुम्ही घेऊ शकता. साधारण ३०० रुपयांपासून पुढे ते टॉप मिळू शकेल.6 / 9६. अशा पद्धतीचा लूक करण्यासाठी थोडा वेळ पाहिजे. कारण मॅचिंग ॲक्सेसरीज आणि परफेक्ट मेकअप असेल तरच असा लूक शोभून दिसतो. म्हणूनच सगळं साहित्य परफेक्ट रेडी असल्यावरच अशा लूकचा विचार करा.7 / 9७. अशा पद्धतीच्या पॅण्टची पण सध्या जबरदस्त फॅशन आहे. ऑनलाईन साईटवरही अशा ड्रेसेसचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.8 / 9८. असं आरशाचं वर्क असणारं किंवा ग्लिटरी टॉप आणि त्याच्याखाली धोती पँट असा पेहरावही दांडियासाठी छान दिसतो.9 / 9८. असं आरशाचं वर्क असणारं किंवा ग्लिटरी टॉप आणि त्याच्याखाली धोती पँट असा पेहरावही दांडियासाठी छान दिसतो. आणखी वाचा Subscribe to Notifications