Navratri Special How to Make Sabudana Rings Crispy Sabudana Rings Delicious Recipe
१ वाटी साबुदाणाचा पटकन बनेल खमंग नाश्ता; उपवासाची एकदम सोपी, नवी रेसिपी-चवीला भारी By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 12:08 PM1 / 7नवरात्राच्या (Navratri 2023) ९ दिवसांत अनेकजण उपवासाचे पदार्थ खातात तर काहीजण फक्त फळं खाऊन उपवास करतात. उपवासाला खाल्ला जाणार सगळ्यात कॉमन पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याची खिचडी रोज रोज नको वाटते.2 / 7साबुदाणे वडे बनवण्यात जास्त वेळ जातो, भरपूर तेल लागतं आणि वडे फुटण्याची शक्यता असते. म्हणून लोक साबुदाणा वडा घरी बनवणं टाळतात किंवा खूप कमी वेळा घरी हा पदार्थ करतात. 3 / 7वाटीभर साबुदाण्यांचा वापर करून तुम्ही पटकन सोपी, खमंग डिश बनवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही फक्त खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 4 / 7१) १ वाटी साबुदाण्यात एका उकडून, मॅश करून घेतलेला बटाटा घाला. २ दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ, मिरच्यांचे काप, बारीक चिरलेली कोथिंबीर, दाण्याचे कुट, लिंबू, मीठ आणि लाल तिखट, जीरं घालून हे सर्व जिन्नस एकजीव करा आणि छान गोळा बनवून घ्या. 5 / 7२) मऊ गोळा तयार करण्यासाठी तुम्ही तेलाचा हात लावू शकता. पीठाचा गोळा तयार केल्यानंतर एखाद्या रिंगप्रमाणे आकार देऊ शकता. 6 / 7३) रिंगसारखा परफेक्ट आकार येण्यासाठी एखादा ग्लास किंवा वाटी घेऊन त्याभोवती हे मिश्रण गोलाकार तयार करून घ्या. त्यानंतर ग्लास वर उचला. तुम्हाला रिंगप्रमाणे परफेक्ट गोल आकार मिळेल. 7 / 7४) तेल गरम झाल्यानंतर या रिंग्स गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या. साबुदाणा रिंग्स तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications