शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नेकलेस डिझाईन ब्लाऊज पॅटर्न!! बघा १० आकर्षक पर्याय, असं ब्लाऊज असेल तर नेकलेसची गरजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2022 1:23 PM

1 / 10
१. लग्नसराई आता लवकरच सुरू होईल. यादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ट्रेण्डी- आकर्षक दिसायचं असेल तर यावर्षीचे लेटेस्ट फॅशन ट्रेण्ड जाणून घेतलेच पाहिजेत. सध्या अशा पद्धतीच्या नेकलेस डिझाईन ब्लाऊज पॅटर्नची जबरदस्त क्रेझ आहे.
2 / 10
२. तुमची साडी डिझायनर असो किंवा मग सिल्कची पारंपरिक काठपदराची. नेकलेस ब्लाऊज पॅटर्न कोणत्याही साडीवर शोभूनच दिसतो. शिवाय तुमचा लूक अगदीच वेगळा भासतो.
3 / 10
३. लूक परफेक्ट होण्यासाठी साडी- ब्लाऊज यासोबत तुम्ही कोणतं गळ्यातलं किंवा कानातलं घालता, या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या ठरतात. पण अशा नेकलेस डिझाईन ब्लाऊज पॅटर्नमध्ये तो प्रश्नच राहात नाही. कारण गळ्यात काही वेगळं घालण्याची गरजच नसते.
4 / 10
४. लेहेंगा घालणार असाल, तर त्याच्या ब्लाऊजवरही तुम्ही असा नेकलेस पॅटर्न करून घेऊ शकता.
5 / 10
५. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि सोनम कपूर यांचा याच पद्धतीचा हा लूकही चांगलाच व्हायरल झाला होता.
6 / 10
६. हा एक अगदी सुंदर आणि वेगळा पॅटर्न. रिसेप्शन, पार्टी यासाठी अशी एखादी प्लेन किंवा साधी साडी असली तरी असं हेवी वर्क असणारं नेकलेस डिझाईन ब्लाऊज तुम्ही त्यासाठी शिवू शकता. त्यामुळे नक्कीच अधिक स्टायलिश दिसाल.
7 / 10
७. या ब्लाऊजची खासियत अशी की तुमची साडी कितीही साधी असली तरी आकर्षक ब्लाऊजमुळे ती नक्कीच चारचौघांत उठून दिसते.
8 / 10
८. ब्लाऊजवर तुम्ही ज्या पद्धतीचं नेकलेस निवडाल, त्यानुसार या ब्लाऊजची किंमत ठरते. अगदी ५०० रुपयांपसून ते ५ हजार रुपयांपर्यंत अशा ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न बाजारात मिळतात.
9 / 10
९. तुमच्या शहरातील लोकल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर असे रेडिमेड ब्लाऊज मिळतात. शिवाय तुमच्या शहरातल्या एखाद्या नामवंत टेलर किंवा फॅशन डिझायनर कडूनही तुम्ही ते तयार करून घेऊ शकता.
10 / 10
१०. सध्या नेकलेस डिझाईन ब्लाऊजची एवढी फॅशन आहे की, अशा पद्धतीचं एक तरी ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असावंच.
टॅग्स :fashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्स