Netizens troll Aishwarya Rai Bachchan's daughter Aaradhya's hairdo at the Ambani event
आराध्याच्या हेअरस्टाइलमुळे ऐश्वर्या राय झाली ट्रोल; ते का? कुणाला शोभतो तो हेअरकट By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 3:13 PM1 / 7नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ग्रॅण्ड लॉन्ज इव्हेण्टचे फोटो सोशल मीडियात व्हायरल आहेत. या कार्यक्रमात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनही आपली लेक आराध्या बच्चनला घेऊन आली होती. आराध्याच्या हेअरस्टाइलमुळे लोक ऐश्वर्याला नावं ठेवत आहेत. म्हणाले मोठी झाली ती आतातरी हेअरस्टाइल बदल. ('Bachi ka hairstyle change karo' : Netizens troll Aishwarya Rai Bachchan's daughter Aaradhya's hairdo at the Ambani event) 2 / 7 ऐश्वर्या आणि तिची मुलगी पारंपरीक कपड्यांत अत्यंत सुंदर दिसत होत्या. आराध्याचा साधेपणाचं, नम्र वर्तनाचं अनेकांनी कौतुक केलं. बच्चन कुटुंबाची लेक आराध्या इतर स्टारकिड्स प्रमाणे नखरे दाखवत नाहीत अशी पावतीही दिली.3 / 7एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘पर्मनंट हेअरस्टाईल’, तर दुसऱ्याने लिहिले, तिची हेअरस्टाइल कोणीतरी बदला. दुसर्याने लिहिले.कुणी म्हणाले, 'यार, तुझ्या मुलीची हेअरस्टाइल बदल, लहानपणापासून हीच आहे.' एकाने लिहिले की, 'आई-मुलगी दोघांनीही त्यांच्या केशरचना बदलण्याची गरज आहे.'4 / 7 सामान्यत: लहान २ ते ६ वर्षांच्या मुलींना हा हेअरकट केला जातो. रसना हेअर कट म्हटलं की लहान मुलांचे गोंडस चेहरे आठवतात. रसना कट दिसायला खूपच क्यूट वाटतो.5 / 7मुलांचे केस सतत डोळ्यांवर येऊ नयेत म्हणून हा हेअर कट करायला सुरूवात केली असावी.6 / 7ही स्टाइल करताना केस एक ते दोन सेक्शन्स घेऊन बारीक कापले जातात आणि साईडचे केस लांब ठेवले जातात. लांब ठेवलेले केस केसांच्या ब्रशनं आतल्या बाजूनं गोल फिरवून योग्य आकार दिला जातो.7 / 7या हेअरकटमध्ये लहान मुलांचे गाल गुबगुबीत, उठून दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications