New Year Resolution Ideas : 12 New Year's Resolution Ideas for 2023 by experts
१ वाटी सॅलेड, १० ग्लास पाणी अन् १२ गोष्टी; २०२३ मध्ये धडधाकट फिटनेस कमवायचा तर घ्या ही यादी! By manali.bagul | Published: December 30, 2022 7:13 PM1 / 13 २०२३ च्या सुरूवातीची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. (New Year 2023) नवीन वर्षात आपण ठणठणीत फिट राहावं. असं प्रत्येकालाच वाटत असणार. त्यासाठी आपण स्वत:ला काही चांगल्या सवयी लावल्या तर आजारांपासून लांब राहण्यास मदत होईल. खासकरून महिलांनी त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. (12 New Year's Resolution Ideas for 2023) महिलांच्या लहान त्रासांचं कधी मोठ्या आजारात रुपांतर होतं ते कळत नाही. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसुतीतज्ज्ञ डॉ. गौरी करंदीकर यांनी वर्षातील १२ महिन्यांप्रमाणे १२ सवयी सांगितल्या आहेत. ज्या तुम्ही स्वत:ला येत्या वर्षाच्या सुरूवातीपासूनच लावल्या तर तब्येत वर्षभर चांगली ठेवण्यास मदत होऊ शकते. 2 / 13रोज १२ सुर्यनमस्कार घालावेत. यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. पाठीच्या कण्याच्या तंदुरुस्तीसाठी, हार्मोन्स, स्नायूंच्या टोनसाठी आणि मेंटल स्ट्रेंथसाठी हा व्यायाम महत्वपूर्ण आहे.3 / 13हिमोग्लोबीन कमीत कमी ११ तरी असायला हवं. कमी हिमोग्लोबिनमुळे शरीराला कमी ऑक्सिजनेशन होतं. आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी वर्षभर टार्गेट हिमोग्लोबिन ११ असेल याची खात्री करा. 4 / 13पाणी प्यायल्यानं विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. किडनी, हार्ट हे अवयव देखील चांगले राहतात. 5 / 13मानसिक आरोग्याचा शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे इमोशन्स म्हणजेच डिप्रेशन, रागावर नियंत्रण ठेवायला हवं. 6 / 13 झोप ही हिलरसारखे काम करते. वेळेवर झोपल्यानं सेट्रल फॅट पोटावरचं फॅट कमी होतं आणि पचनक्रिया चांगली राहते. दिवसभर उत्साही वाटतं. 7 / 13बऱ्याच महिलांना मल्टीटास्कींग करावं लागतं. त्यामळे थकल्यासारखं वाटतं. स्वत:ला वेळ देता येत नाही. मेनोपॉजच्या वेळेसही ताण जाणवतो. रोज नियमित मेडिटेशन केल्यानं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.8 / 13 या टेस्टद्वारे शरीरातील शुगर तपासली जाते. 6 पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ शुगर मेंटेनस चांगला आहे. डाएट आणि व्यायाम व्यवस्थित सुरू आहे. 9 / 13आठवड्यातून कमी कमी ५ दिवस तरी व्यायाम करायला हवा. झुंबा, योगा, जीम, रनिंग कोणत्याही व्यायामाची निवड तुम्ही करू शकता. 10 / 13 स्तन, गर्भाशयाच्या कर्करोगाची जोखीम टाळण्यासाठी स्क्रिनिंग करून घ्या. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तरूण मुलींनी सर्वाकल कॅन्सरच्या लसीबाबत माहिती मिळवून ती लस घ्यायला हवी. ४० नंतर महिलांनी कौटुंबिक इतिहास असेल किंवा स्वत:ला काही त्रास जाणवत असले तर त्वरीत तपासणी करावी.11 / 13कोणत्याही ३ फळांचा आणि सॅलेड्चा अन्नाच्या ३ भागांमध्ये समावेश करावा. 12 / 13या वर्षात तुम्ही कमीत कमी २ नवीन मैत्रिणी बनवा. आपण प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकत असतो. . या माध्यमातून २ स्किल्स, छंद शिकायला मिळू शकतात. 13 / 13वेस्ट हिप रेशो हा १ पेक्षा कमी असावा. हा रेशो जास्त असेल तर डायबिटीस, पीसीओएस, इन्फर्टिलीटी, लिव्हरचे आजार होऊ शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications