शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नव्या नवरीसाठी ब्लाऊजचे ५ खास डिझाइन्स! साध्या साडीवरही दिसतील शोभून, सुंदर आणि आकर्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2025 18:05 IST

1 / 7
सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशातच नव्या नवरीसाठी सगळ्यात अवघड काम असते ते ब्लाऊजचे डिझाइन्स सिलेक्ट करणे. सुंदर आणि फॅन्सी दिसण्यासाठी आपण नवीन पद्धतीचे डिझाइन्स शोधत असतो.
2 / 7
लग्नात आपण जास्त भरलेली साडी किंवा इतर कोणत्याही फंक्शनमध्ये साधी साडी नेसणार असू तर ब्लाऊजच्या गळ्यासाठी या डिझाइन्स शोभून दिसतील.
3 / 7
रॉयल वी नेकमध्ये जरी आणि रेशमी भरतकाम केले आहे. ज्यामुळे हे ब्लाऊज आपल्याला शाही लूक देते. व्ही नेक डिझाइन्स आपल्या खांद्यांना आणि नेकलाइनला हायलाइट करते.
4 / 7
मिरर वर्क असलेला डीप नेक ब्लाऊज आपण हळदी किंवा मेहंदी फंक्शनमध्ये घालू शकतो.
5 / 7
कॅप स्टाईल ब्लाऊज हे डिझाइन खूप ट्रेंडमध्ये आहे. हे फोटोशूटसाठी नवरीच्या लूकमध्ये अधिक भर घालते.
6 / 7
गोल्डन सिक्विन ब्लाऊज नव्या नवरीसाठी सुंदर डिझाइन आहहे. यामध्ये आपल्याला मोठा हार किंवा चौकर घालता येते. ज्यामुळे सौंदर्य खुलून दिसते.
7 / 7
फॅन्सी ब्लाऊज डिझाइन्समध्ये व्ही नेक, गोल्डन सिक्विन एम्ब्रॉयडरी सारखे डिझाइन्स आपल्याला अधिक खास बनवतात. हे ब्लाऊज आपल्या लूकला परिपूर्ण बनवतात.
टॅग्स :fashionफॅशनWomenमहिला