शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ना तेलाची चिपचीप, ना औषधांची गरज.. घरी करा 'असा' हेअर स्प्रे.. घरात वापरा, बाहेर वापरा- केस होतील घनदाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 20:09 IST

1 / 8
सध्या वाढत्या शारीरिक समस्यांपैकी एक म्हणजे केसांचे गळणे. अगदी तरुण वयातच टक्कल पडेल की काय अशी भीती तुम्हालाही वाटायला लागली आहे का? मग हे उपाय तुमच्यासाठीच आहेत.
2 / 8
केसांना तेल लावले तरी केस गळायचे काही थांबत नाहीत. बाहेर जाताना केसांना तेल लावता येत नाही. तेलामुळे केस फार चिकट दिसतात. तेलकट केस असले की मानेला आणि कपाळालाही तेल सुटायला लागते.
3 / 8
मात्र एक असा उपाय आहे जो तुम्ही घरी, बाहेर, ऑफीस सगळीकडे वापरू शकता. तो म्हणजे हेअर स्प्रे. हेअर स्प्रेमुळे केस गळतात अशा काही तक्रारी मध्यंतरी फार व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे हेअर स्प्रे वापरावा की नाही? असा प्रश्न पडतो.
4 / 8
पण तुम्हाला माहिती आहे का? घरी हेअर स्प्रे करता येतात. करायला अगदीच सोपे आहेत. टिकतातही अनेक दिवस. केसांसाठी फायदाही होतो. रिझल्टही कमालीचा असतो. केस मऊ होतात. गळत नाहीत. दिसतातही छान.
5 / 8
मेथीचे दाणे व कडीपत्ता पाण्यामध्ये उकळायचा. पाण्याचा रंग जरा हिरवट झाला की गॅस बंद करायचा. पाणी गार करून घ्यायचे. मग स्प्रे बॉटलमध्ये भरुन घ्यायचे. जर केस वेळे आधीच पांढरे होत असतील तर हे पाणी वापरा. तसेच केसांना पोषणही मिळते.
6 / 8
केस फार गळत असतील तर मग रोजमेरीचा स्प्रे वापरा. पाण्यामध्ये रोजमेरी घाला. पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. नंतर स्प्रे बॉटलमध्ये गाळून घ्या. रोज केसांवर लावा. काही महिन्यांमध्ये केस गळणे कमी होईल.
7 / 8
जास्वंदीचे फुलही केसांसाठी फार चांगले असते. पाण्यामध्ये जास्वंदीचे फुल उकळवा. जास्वंदीची पानेही वापरा एखादा लिंबू त्यामध्ये टाकलात तर आणखी फायद्याचे ठरेल. झोपण्यापूर्वी केसांना हे पाणी लावत जा.
8 / 8
हेअर स्प्रे वापरल्यावर केसांना जेंटल मसाज करायचा. बोटांच्या टोकांनी हळूहळू मालीश करायचे. स्प्रे केसांच्या मुळांपाशी पोहचला तरच त्याचा फायदा होईल. वरच्यावर लावला तर त्याचा फार काही फायदा होणार नाही.
टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHome remedyहोम रेमेडी