शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑफिसला साडी नेसता, पाहा ब्लाऊजच्या गळ्यांचे ७ डिझाइन्स, असे शिवा दिसाल प्रोफेशनल स्टायलिश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2025 15:58 IST

1 / 8
आपल्यापैकी बऱ्याचजणी थोडं वेगळं म्हणून इतर आऊटफिट्स सोबतच काहीवेळा (Office Wear Saree Blouse Neck Designs) ऑफिसवेअर साडी देखील नेसतात. परंतु अशा ऑफिस वेअर साड्यांवर ब्लाऊज कोणत्या नेकपॅटर्नचा (Blouse Neck Designs for Office Wear) शिवावा असा प्रश्न पडतो. यासाठीच, ऑफिसलुकला साजेसा, कम्फर्टेबल अशा वेगवेगळ्या ब्लाऊजचे नेकपॅटर्न पाहूयात ( Simple Office Wear Blouse Designs Blend of Comfort and Style).
2 / 8
तुम्ही अशा पद्धतीचा स्टँड कॉलर नेक पॅटर्न असणारा सुंदर ब्लाऊज शिवू शकता. स्टॅंड कॉलर ब्लाऊजमुळे ऑफिसमध्ये तुमचा लूक प्रोफेशनल आणि क्लासी दिसण्यास मदत होते.
3 / 8
स्टॅंड कॉलर सारखाच थोडाफार दिसणारा हा प्रकार हाय नेक पॅटर्न खूप सुंदर दिसेल. हाय नेक पॅटर्नचा हा ब्लाऊज तुम्हाला साडीवर परफेक्ट ऑफिस लूक देईल.
4 / 8
झिरो नेक पॅटर्न ब्लाऊजचा गळा हा संपूर्णपणे बंद असतो. एखाद्या कुर्त्याच्या नेक पॅटर्न प्रमाणेच हा गळा दिसतो. तुम्ही ऑफिसवेअर साडीवर अशा प्रकारचा ब्लाऊज शिवून घालू शकता.
5 / 8
हॉल्टर नेक पॅटर्नचा ब्लाऊज हा दिसायला टीशर्ट प्रमाणेच असतो. ऑफिसवेअर साडीवर अशा नेक पॅटर्नचा ब्लाऊज अधिकच सुंदर दिसतो. तुम्ही काळ्या रंगाच्या एका हॉल्टर नेक पॅटर्नच्या ब्लाऊजवर वेगवेगळ्या साड्या देखील नेसू शकता.
6 / 8
ऑफिसवेअर ब्लाऊजमध्ये बोट नेक पॅटर्नचा ब्लाऊज हा एकदम उत्तम आणि कम्फर्टेबल पर्याय ठरु शकतो. बोट नेक पॅटर्न ब्लाऊजमुळे तुमच्या साडीचा लूक देखील अधिक खुलून दिसेल.
7 / 8
तुम्ही अशा पद्धतीचा कॉलर असणारा शर्ट सारखा दिसणाऱ्या पॅटर्नचा ब्लाऊज देखील नक्की ट्राय करू शकता. अशा पॅटर्नच्या ब्लाऊजमुळे तुम्हांला बॉसी, स्टायलिश आणि परफेक्ट ऑफिसलूक मिळेल.
8 / 8
ऑफिसमध्ये कॉटनच्या साड्या नेसणार असाल तर अशा पद्धतीचं टर्टल नेक ब्लाऊज शिवा आणि त्याला समोरच्या बाजुने बटन लावा. एकदम फॉर्मल लूक मिळून चारचौघांवर तुमची नक्कीच छाप पडेल.
टॅग्स :fashionफॅशनStyling Tipsस्टायलिंग टिप्स