शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्नसराईसाठी साडी घ्यायचीये? ऑर्गेंझा साडीचे ७ लेटेस्ट प्रकार, पाहा तुम्हाला कोणता पॅटर्न आवडतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2022 5:53 PM

1 / 7
आपल्याला वेगवेगळ्या काठाच्या, प्रिंटच्या किंवा कापडाच्या पॅटर्ननुसार प्रकार माहित असतात. पण गेल्या काही वर्षात प्रसिद्ध झालेला ऑर्गेन्झा हा साडीचा प्रकार भलताच फेमस झाला आहे. अभिनेत्रींपासून ते सामान्य स्त्रियांपर्यंत सगळ्यांच्याच पसंतीस उतरणाऱ्या या ऑर्गेन्झा प्रकारातील साड्यांचे लेटेस्ट पॅटर्न पाहूया (Organza Saree latest Patterns)...
2 / 7
लग्नसराई किंवा आणखी काही निमित्ताने तुम्ही साडी खरेदीचा प्लॅन करत असाल तर वजनाला हलकी आणि तरीही सुंदर दिसणारा हा साडीचा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करु शकता. यामध्ये बांधणी प्रकारातील नाजूक काठांची साडी तुमचा लूक खुलवायला मदत करेल.
3 / 7
गेल्या काही वर्षात कलमकारी हा पॅटर्नही बराच प्रसिद्ध झाला आहे. पाना-फुलांचे डिझाईन असलेल्या या पॅटर्नमध्ये विविध रंग आणि डिझाईन्स पाहायला मिळतात. बॉलीवूडमधील अभिनेत्रीही या प्रकारातील साड्यांना विशेष पसंती देताना दिसतात.
4 / 7
लग्न किंवा एखाद्या फंक्शनसाठी आपण साडी पाहत असू तर काठापदरापेक्षा थोडी वेगळी आणि वजनाने हलकी, वर्क असलेली साडी घेणे आपण पसंत करतो. अशावेळी ऑर्गेंझा प्रकारातील नाजूक वर्क असलेली साडी अतिशय मस्त दिसते.
5 / 7
लग्न किंवा एखाद्या फंक्शनसाठी आपण साडी पाहत असू तर काठापदरापेक्षा थोडी वेगळी आणि वजनाने हलकी, वर्क असलेली साडी घेणे आपण पसंत करतो. अशावेळी ऑर्गेंझा प्रकारातील नाजूक वर्क असलेली साडी अतिशय मस्त दिसते.
6 / 7
काठापदराचीच पण थोडी वेगळ्या पॅटर्नची साडी हवी असेल तर बनारसी ऑर्गेन्झा या प्रकाराचा विचार तुम्ही नक्कीच करु शकता. ही साडी ऑर्गेन्झा असली तरी पारंपरिक लूकही देऊ शकते, त्यामुळे तुम्ही एखाद्या सणावारालाही ही साडी नक्की कॅरी करू शकता.
7 / 7
थोडी डिझायनर आणि फॅन्सी पॅटर्नची साडी घ्यायचा प्लॅन असेल तर ऑर्गेन्झा प्रकारातील वर्क असलेल्या किंवा एम्ब्रॉडरी असलेल्या साड्या समारंभाला आपल्यावर उठून दिसतात. या साड्या वर्क असूनही हलक्या-फुलक्या असल्याने कॅरी करायलाही सोप्या असतात.
टॅग्स :Shoppingखरेदीsaree drapingसाडी नेसणेfashionफॅशन