शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सध्या ज्याची वेड्यासारखी क्रेझ आहे ते पर्पल डाएट नक्की काय आहे? जो तो काय ‘जांभळ्या’ गोष्टी खातोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 4:29 PM

1 / 9
निरोगी जीवन जगण्यासाठी रंगीत-हेल्दी आहार घेणं गरजेचं आहे. रंगीबेरंगी पदार्थ आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतात. आपण हिरव्या पालेभाज्यांपासून पिवळ्या रंगाच्या डाळींचा समावेश आहारात केलाच असेल. पण आपण कधी पर्पल डाएटबद्दल ऐकून आहात का?(Purple foods: List of foods, health benefits, and more).
2 / 9
वजन कमी करण्यासाठी किंवा निरोगी आयुष्य जगण्यासाठी डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. आपण जर पर्पल डाएट फॉलो केलं तर नक्कीच आरोग्याला अनेक फायदे मिळतील. पर्पल रंगाच्या पदार्थांमध्ये अँटी-ऑक्सिडेंटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे कर्करोग, लठ्ठपणा यासह इतर आजारांपासून आराम मिळतो.
3 / 9
त्यातील पौष्टीक घटक ब्लड प्रेशर, गुड कोलेस्टेरॉलमध्ये वाढ, यासह हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मुख्य म्हणजे ब्लड सर्क्युलेशनमध्ये कोणतेही व्यत्यय येत नाही.
4 / 9
पर्पल रंगाचे पदार्थ त्वचेसाठी उत्तम मानले जाते. ब्लूबेरी, ब्लॅकबेरी आणि प्लम हे अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध फळे आहे. जे त्वचेला रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून सरंक्षण करतात. ज्यामुळे आपली त्वचा तरुण दिसते.
5 / 9
पर्पल रंगाचे पदार्थ जसे की, कोबी, कांदे, वांगी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, ब्लॅककरंट्स आणि कॉन्कॉर्ड द्राक्षांमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे नैसर्गिक रंगद्रव्य असते. यामध्ये रेझवेराट्रोल देखील असते, जे रक्तदाब नियंत्रित करते. ज्यामुळे कर्करोगापासून रक्षण होते.
6 / 9
पर्पल रंगाच्या रताळ्यातील अँथोसायनिन्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. पर्पल रंगाचे पदार्थ अँथोसायनिन्स पेशींचे नुकसान टाळतात.
7 / 9
पर्पल रंगाच्या गाजरांमध्ये अँथोसायनिन्स आणि प्रो-व्हिटॅमिन ए कॅरोटीनोइड्स असतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात. पर्पल रंगाचे फुलकोबी, काळा तांदूळ, पर्पल रंगाचे रताळे, पर्पल कॉर्न आणि धान्य, हे पदार्थ खनिजांनी समृद्ध असतात. हे पदार्थ शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास व शरीराचे वजन नियंत्रित करण्यात मदत करतात.
8 / 9
जर आपण केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर, आहारात ब्लॅकबेरीचा समावेश करा. शिवाय पर्पल बीटरूट अन्न डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात.
9 / 9
पर्पल रंगाच्या वांग्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे अन्न तर वेळेवर पचतेच शिवाय वजन देखील वाढत नाही.
टॅग्स :foodअन्नFitness Tipsफिटनेस टिप्स