शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राखीपौर्णिमा 2024: लाडक्या भावासाठी एकदम हटके राखी घ्यायची? बघा कस्टमाईज राख्यांचे ७ सुंदर प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2024 2:41 PM

1 / 8
राखीपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे ज्या बहिणी नेहमी इतरांपेक्षा हटके, वेगळ्या स्टाईलच्या राख्यांच्या शोधांत असतात, त्यांची शोधमोहीम आता सुरू झाली आहे. (Rakhi Pournima 2024)
2 / 8
बाजारात यावर्षी अनेक वेगवेगळ्या राख्या आलेल्या आहेत. तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर तुम्ही अशा पद्धतीची चांदीची कस्टामाईज राखी भावाला देऊ शकता.
3 / 8
भावाचा फोटो मधोमध घालून अशा पद्धतीची राखी तयार करून घ्या. भावाला अशी राखी नक्कीच आवडेल.
4 / 8
भावाच्या फोटो घालण्यासाठी असे वेगवेगळे डिझाईन्सही तुम्ही वापरू शकता.
5 / 8
अशा पद्धतीचं नाव लिहिलेली राखी प्रत्येक भावासाठी घ्या. नक्कीच तुमचं वेगळेपण त्यात जपलं जाईल.
6 / 8
तुमच्या भावाचा स्वभाव कसा आहे, त्यानुसार अशा पद्धतीची भावाच्या स्वभावाचं वर्णन करणारी राखीही तुम्ही घेऊ शकता.
7 / 8
भावाचा फोटो आणि त्याचं स्वभाव वैशिष्ट्य हे सांगणारी ही राखी पण मस्त वाटते.
8 / 8
प्रत्येक बहिणीसाठी तिचा भाऊ हिरो असतो. अशा तुमच्या कर्तृत्ववान भावासाठी या राखीची निवड करा.. त्यालाही छान वाटेल...
टॅग्स :ShoppingखरेदीRaksha Bandhanरक्षाबंधन