शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raksha bandhan 2022 : लाडक्या भावालाही राखीपौर्णिमेला द्या मायेची भेट, 7 गिफ्ट पर्याय- निवडा भावाला आवडेल असे खास गिफ्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2022 5:16 PM

1 / 8
राखी पौर्णिमा म्हटली की राखी बांधल्यावर ओवाळणी म्हणून भावाकडून मिळणाऱ्या भेटवस्तूची आजही आपण आतुरतेने वाट पाहतो (Raksha Bandhan Gift Ideas). भाऊ आपल्याला काय देणार याची आपल्याला उत्सुकता असतेच तशी एक्सायटमेंटही असते (Raksha bandhan 2022).
2 / 8
आता भावानं बहिणीला गिफ्ट द्यायचं असतं, हे जरी ठिक असलं तरी आजच्या काळात बहिणीही कमावत्या असतात. भाऊ ज्याप्रमाणे आपले लाड करतो त्याचप्रमाणे आपणही त्याला हौशेनी एखादी छानशी भेटवस्तू नक्कीच देऊ शकतो. पाहूयात राखीच्या निमित्ताने भावाला गिफ्ट देता येतील असे काही खास पर्याय...
3 / 8
आपला भाऊ कॉलेजला किंवा ऑफीसला जात असेल तर त्याला पाण्याची बाटली किंवा डबा नक्कीच लागत असणार. सध्या बाजारात ब्रँडेड डबे आणि बाटल्यांबरोबरच नाव किंवा फोटो एम्बॉस केलेल्या बाटल्या आणि डबे अगदी सहज मिळतात. आपल्या भावाला आपण अशी एखादी छानशी बाटली किंवा डबा नक्की देऊ शकतो. अगदी २०० ते ३०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत हे मिळू शकते.
4 / 8
कॅप ही तमाम मुलांना लागणारी एक महत्त्वाची गोष्ट. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी लागणारी या कॅप कितीही घेतल्या तरी कमीच पडतात. भर उन्हात बाहेर जाताना डोक्याचे संरक्षण व्हावे यासाठी वापरली जाणारी ही कॅप आपण गिफ्ट म्हणून नक्कीच देऊ शकतो. यामध्ये भावाला आवडत असलेल्या खेळाडूच्या नावाची, एखाद्या विशिष्ट थीमची कॅप तयारही करुन मिळते. ब्रँडेड कॅपच्या किंमती ५०० रुपयांपासून काही हजारांपर्यंत असतात.
5 / 8
टेबल लँप ही अतिशय आवश्यक आणि होम डेकॉरमधली एक महत्त्वाची गोष्ट आहे. रात्रीच्या वेळी किंवा दिवसाही ड्रेसिंग टेबलजवळ ठेवता येईल असा एखादा छानसा लँप दिल्यास मुलांना त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. रात्री वाचन करत असल्यास किंवा उशीरापर्यंत ऑफीसचे काम करण्यासाठी या लँपचा वापर करता येईल. अगदी २०० पासून ते १५०० रुपयांपर्यंत हे लँप बाजारात उपलब्ध आहेत.
6 / 8
मुलींना ज्याप्रमाणे वॉलेट, पर्स, सॅक असे काही ना काही देता येते. त्याचप्रमाणे मुलांनाही पाऊच, वॉलेट किंवा एखादी छानशी सॅक गिफ्ट म्हणून देता येऊ शकते. मुलं आपल्या या वस्तूंकडे फारच कमी लक्ष देतात. त्यामुळे त्या खराब झाल्या तरी ते बदलण्याचे कष्ट ते घेतातच असे नाही. अशावेळी मुद्दाम आपण असे काही गिफ्ट दिल्यास ते आवर्जून आपण दिलेली गोष्ट वापरु शकतात. यामध्ये आपण लोकल ते ब्रँडेड असे आपल्या बजेटनुसार घेऊ शकतो.
7 / 8
आपल्या भावाला वाचनाची आवड असेल तर त्याच्या आवडीनुसार एखादे छानसे पुस्तक आपण त्याला गिफ्ट देऊ शकतो. इतकेच नाही तर हल्ली काही प्रकाशनसंस्था किंवा दुकाने पुस्तके खरेदी करण्यासाठी कूपन्स उपलब्ध करुन देतात. ही कूपनही गिफ्ट म्हणून देता येऊ शकतात.
8 / 8
उशी ही घरात, ऑफीसमध्ये, गाडीमध्ये अशी सगळ्या ठिकाणी आवश्यक असणारी आणखी एक गोष्ट आहे. बसताना, झोपताना केव्हाही लागणारी ही उशी मुलांना दिल्यास त्यांना नक्कीच त्याचा चांगला उपयोग होईल. या उशीवर आपण आपल्या दोघांचा फोटो किंवा त्याचा एकट्याचा फोटो प्रिंट करुन देऊ शकतो. इतकेच नाही तर एखादा चांगला मेसेज किंवा भावाचे नावही लिहून देऊ शकतो.
टॅग्स :ShoppingखरेदीGift Ideasगिफ्ट आयडियाRaksha Bandhanरक्षाबंधनRakhiराखी