शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गौरींच्या स्वागताला दारासमोर काढा नाजूक- सुंदर पाऊलं! बघा झटपट पाऊलं काढण्याची युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2024 2:20 PM

1 / 9
गणरायाचे आगमन झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठच महालक्ष्मीचेही आगमन होते. काही ठिकाणी त्यांना गौरी, ज्येष्ठागौरी असंही म्हणतात. गौरी- गणपतीचा हा सण मोठाचा उत्साहाचा, आनंदाचा असतो.
2 / 9
महालक्ष्मी किंवा गौरीच्या सणात आपण दारापुढे मोठी रांगोळी तर काढतोच. पण त्याबरोबरच गौरीची नाजूक पाऊलंही घरभर आणि घराच्या मुख्य द्वारापाशी काढली जातात.
3 / 9
ती पाऊलं सुबक पद्धतीने कशी काढायची याच्या काही आयडिया पाहिजे असतील तर त्यासाठी या काही छान डिझाईन्स पाहा.
4 / 9
सगळ्यात सोपी ही एक पद्धत पाहा. अशा प्रकारची पाऊले अगदी झटपट काढून होतील.
5 / 9
वर सांगितलेल्या पाऊलांमध्ये हळदीचा आणि कुंकवाचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने त्यांना अधिक ठसठशीत करू शकता.
6 / 9
गौरीची पाऊलं काढण्याची ही आणखी एक सोपी पद्धत बघा. वर मोठा ठिपका आणि खाली छोटा ठिपका. तसेच बोटांचे पाच छोटे- छोटे ठिपके. एवढेच काढले तरी अशी सुरेख पाऊलं तयार होतात.
7 / 9
अशा पद्धतीचा पाऊलांचा आकारही खूप आकर्षक वाटतो. अगदी खरं पाऊल ठेवलं आहे, अशा पद्धतीचा भास ही पाऊलं पाहून होतो.
8 / 9
गौरीच्या मखरासमोर किंवा घराच्या मुख्य द्वारासमोर रांगोळी काढायची असेल तर अशा पद्धतीची सुंदर रांगोळी तुम्ही काढू शकता.
9 / 9
घराच्या मुख्य दारापाशी जर गौरीच्या सणादरम्यान रांगोळी काढायची असेल तर हे एक डिझाईन अतिशय सुंदर दिसेल.
टॅग्स :Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४rangoliरांगोळी