शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रिफाईंड ऑईल चांगलं की घाण्याचं तेल? तज्ज्ञ सांगतात, कोणतं तेल कशासाठी वापरावं-कशाचा होतो त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 9:13 AM

1 / 6
स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरावं, ते किती प्रमाणात असावं, मुळात तेल खावे की नाही... असे तेलाविषयीचे वेगवेगळे प्रश्न नेहमीच अनेक जणांना पडतात. व्हेजिटेबल ऑईल, रिफाईंड ऑइल, कोल्ड प्रेस ऑईल किंवा घाण्याचे तेल असे अनेक वेगवेगळे प्रकारचे तेल बाजारात मिळतात.(refined oil or cold pressed oil? which oil is more healthy?)
2 / 6
त्यापैकी कोणते खावे आणि कोणते टाळावे हा प्रश्नही असतोच. आहारतज्ज्ञ शालिनी सुधाकर यांनी सांगितलेली माहिती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहे. त्यामध्ये बघा त्या नेमकं काय सांगत आहेत.... (which is the best oil for cooking?)
3 / 6
रिफाईंड ऑईल म्हणजे असं तेल ज्यावर खूप वेगवेगळ्या प्रक्रिया करून ते तयार केलं जातं. प्रकिया करून या तेलाचं शेल्फ लाईफ वाढवलं जातं. अशा तेलाला रिफाईंड ऑइल म्हणतात. या प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा त्याच्यातले नैसर्गिक पौष्टिक घटक कमी होतात.
4 / 6
रिफाईंड तेलाचा स्मोकिंग पॉईंट खूप जास्त असतो. त्यामुळे तळण्यासाठी हे तेल तुम्ही वापरू शकता.
5 / 6
घाण्याच्या तेलालाच कोल्ड प्रेस ऑईल म्हणतात. ते पारंपरिक घर्षण क्रियेतून तयार होतं. रिफाईंड तेलावर जेवढ्या प्रक्रिया केल्या जातात तेवढ्या घाण्याच्या तेलावर केल्या जात नाहीत. त्यामुळे त्या तेलातले पौष्टिक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स तसेच राहतात. या तेलाचा स्मोकिंग पॉईंट खूप कमी असतो. त्यामुळे शक्यतो तळण्यासाठी हे तेल वापरू नये.. इतर स्वयंपाकासाठी ते वापरावे.
6 / 6
त्यामुळे रिफाईंड ऑइल हे तळण्यासाठी तर कोल्ड प्रेस ओईल इतर स्वयंपाकासाठी वापरणे कधीही चांगले, असं शालिनी सुधाकर सांगतात.
टॅग्स :foodअन्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स