'या' बॉलिवुड अभिनेत्रींनी बांधली स्वत:पेक्षा कमी वयाच्या मुलाशी लग्नगाठ; पाहा जोडप्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 13:01 IST
1 / 7तारक मेहता का उल्टा चश्माची ‘बबीता जी’ म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या तिचा को-स्टार राज अंदकत सोबत असलेल्या अफेअरमुळे चर्चेत आहे. नुकतच तिने एक खुलं पत्र लिहून युझर्स वर नाराजगी व्यक्त केली आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा लहान वयाच्या पार्टनरबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे. भारतीय समाजात पूर्वी लग्नाचा विषय काढला की मुलगा मुलीपेक्षा वयानं मोठाच असावा हे ठरलेलं असायचं. या दृष्टीकोनात हळूहळू बदल झालेला पाहायला मिळाला. बॉलिवुडमधील अनेक अभिनेत्रींनी या विचारसरणीला कलाटणी देत आपल्या वयापेक्षा कमी वयाच्या पार्टनरशी लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे आता ही जोडपी आपलं नातं टिकवण्यात आणि सुखी संसारात यशस्वी झाली आहेत.2 / 7आजकाल ज्यांचं नातं सर्वाधिक चर्चेत आहे ते जोडपं म्हणजे प्रियांका आणि निक जोनास. या दोघांच्या वयात सुमारे 10 वर्षांचे अंतर आहे. प्रियांका निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे आणि सुरुवातीला त्यांचे नाते खूप ट्रोल झाले होते पण प्रियंका आणि निक दोघेही आपलं नातं चांगलं टिकवत आहेत.3 / 7बिपाशा बसू पती करणपेक्षा ४ वर्षांनी मोठी आहे आणि याच कारणामुळे करणची आई या लग्नासाठी तयार नव्हती पण तरीही करणने बिपाशाशी लग्न केले. बिपाशा हे नाते अत्यंत आनंदानं सांभाळत आहे. या दोघांचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.4 / 7अभिषेक बच्चनने 2007 मध्ये ऐश्वर्याशी लग्न केले. इथेही ऐश्वर्या अभिषेकपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे पण आजही हे जोडपं सुखी आयुष्य जगत आहे.5 / 7२०१५ मध्ये सैफ अली खानची बहीण सोहा अली खानने बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केले. सोहा कुणालपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे पण दोघेही या नात्यात खूप आनंदी आहेत.6 / 7नेहा धूपिया अंगद बेदीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणा-या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 7 / 7टिव्हीची लाफ्टर क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्चना पूरन सिंह यांनी १९९२ मध्ये परमीत सेठीशी लग्न केले. दोघांच्या प्रेमाची कथाही बरीच चर्चेत होती. वास्तविक, अर्चनाचे शेवटचे रिलेशन अयशस्वी ठरले होते, ज्यामुळे तिने नात्यांवर विश्वास ठेवणे बंद केले. अर्चना परमीतपेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे पण आता ती तिच्या आयुष्यात आनंदी आहे.