Republic Day Tricolour Food Ideas : 10 Easy Tricolor Recipes for Republic Day
Republic Day : प्रजासत्ताक दिनाला करा चविष्ट तिरंगा रेसेपीज; ८ चवदार मेन्यू आयडियाज, पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 5:59 PM1 / 9देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जाणार आहे. सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर प्रत्येकजण या सुट्टीचा आनंद घेतो. प्रजासत्ताक दिनाला तिरंग्याचे तीन रंग वापरून तुम्ही चविष्ट, रेसेपीज बनवू शकता. या रेसेपीजचे फोटोज सोशल मीडियावर टाकून मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करता येतील. यानिमित्तानं नवीन काहीतरी केल्याचा आनंद मिळले. (Tricolour Food Ideas)2 / 9रवा इडली किंवा तांदळाच्या पीठाची इडली नाश्त्याला करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तीन वेगवेगळ्या भांड्यात इडलीचं पीठ घेऊन त्यात हिरवा आणि केशरी रंग मिसळून इडलीच्या साच्यात भरा आणि नेहमीप्रमाणे शिजवून घ्या3 / 9तिरंगा पुलाव करण्यासाठी बासमती तांदूळ अर्धवट शिजल्यानंतर त्यात हिरवा आणि नारंगी रंग घाला.4 / 9 सॅण्डविच करताना वरच्या आणि खालच्या भागाला केशरी आणि हिरवा रंग लावून मध्ये व्हाईट ब्रेड ठेवा. 5 / 9इडलीप्रमाणेच तुम्ही डोश्याच्या पीठातही नारंगी आणि हिरवा रंग घालून डोसा बनवू शकता. 6 / 9 खोबऱ्याच्या किसामध्ये किंवा चण्याच्या पिठात खाण्याचे रंग मिसळून ही बर्फी तयार करा. 7 / 9तिरंगा मिल्कशेक किंवा आईस्क्रीमसुद्धा उत्तम पर्याय आहे. 8 / 9 आलू पराठा किंवा कोबी पराठा दुपारच्या जेवणासाठी बनवणार असाल तर गव्हाचं पीठ मिळताना त्याचे २ भाग करून हा खाण्याचा रंग मिसळा आणि मग पराठा लाटून त्यात स्टफिंग भरा.9 / 9तीन रंगाचे बॅटर बनवून तुम्ही तिरंगा ढोकळा बनवू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications