शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उडप्याकडे मिळते तशी परफेक्ट कॉफी करण्यासाठी दुधात केव्हा - किती चमचे कॉफी घालावी, पहा खास सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2024 8:02 AM

1 / 8
जेव्हा कामाचा ताण वाढतो किंवा काम करून कंटाळा येतो तेव्हा पटकन रिफ्रेश होण्यासाठी आपण एक कप कॉफी (Right Way To Make Coffee) घेतो. कॉफी प्यायल्याने थकलेलं, मरगळलेले शरीर पुन्हा एकदा रिफ्रेश होऊन पुढच्या कामाला लागते. अशी ही आपल्याला रिफ्रेश करणारी 'कॉफी' (7 Rules for How to Make a Perfect Cup of Coffee) चवीला परफेक्ट झाली तरच प्यायला चांगली लागते, कॉफी तयार करताना आपण दूध, साखर, पाणी आणि कॉफी या पदार्थांचा वापर करतो. पण कॉफी चवीला परफेक्ट होण्यासाठी दुधात कॉफी केव्हा आणि किती चमचे घालावी ते बऱ्याच जणांना माहित नसते. अशा लहानसहान चुकांमुळेच कॉफीची चव बिघडते. यासाठी कॉफी परफेक्ट करण्यासाठी काही टिप्स पाहूयात(Tips For Making Perfect Coffee At home).
2 / 8
१. कॉफी चवीला परफेक्ट होण्यासाठी दूध आणि कॉफीचे प्रमाण आपण किती घेतो यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. जर कॉफी पावडर जास्त झाली तर कॉफी खूपच कडू होते आणि कमी झाली तर फक्त दुधाचीच चव लागते. कॉफी पावडरची चव हलकीशी कडू असते. यासाठी १ कप दुधात २ चमचे कॉफी पावडर मिसळणे चांगले. यामुळे तुमच्या कॉफीची चव खराब होत नाही.
3 / 8
२. कॉफी तयार करण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करु नका. कच्च्या दुधात आधी कॉफी घालून मग ते गरम केल्यास त्या कॉफीला दुधाचा वास येतो. यामुळे कॉफी तयार करताना आधी दूध पूर्णपणे गरम करुन घ्यावे. दूध व्यवस्थित गरम झाल्यानंतरच त्यात कॉफी घालावी. काहीजण कॉफीमध्ये फ्रॉथ बनवण्यासाठी कच्चे दूध वापरतात, पण कच्चे दूध घातल्याने कॉफी पातळ होते. तसेच कॉफीमधून वास येऊ लागतो. म्हणूनच कॉफी बनवताना तापवलेलं दूध वापरणे केव्हाही चांगले.
4 / 8
३. कॉफीची चव परफेक्ट होण्यासाठी उकळत्या दुधात कॉफी घालावी. याचबरोबर फेसाळती कॉफी करण्यासाठी कॉफी मगमध्ये आधी १ टेबलस्पून कॉफी घेऊन त्यात आवडीप्रमाणे साखर, थोडेसे दूध आणि पाणी घालून व्यवस्थित हलवून कॉफी आधी फेटून घ्यावी. या फेटून घेतलेल्या कॉफीत उकळते दूध घातल्यावर विकत मिळते तशी परफेक्ट फेसाळती कॉफी तयार होते. या कॉफीत आपण आपल्या आवडीप्रमाणे चॉकलेट पावडर देखील वरुन भुरभुरवून घालू शकता.
5 / 8
४. कॉफीमध्ये दूध घालण्यापूर्वी ती हलकेच फेटा यामुळे कॉफीची चव दुप्पट होईल. याचबरोबर कॉफीमध्ये फ्रॉथही तयार होईल आणि तुमची कॉफी एखाद्या रेस्टॉरंटसारखी दिसेल.
6 / 8
५. कोल्ड कॉफी करताना काहीजण थेट कॉफी पावडर आणि दूध यांचे मिश्रण एकत्रित करतात. त्यामुळे कॉफीची टेस्ट बिघडू शकते. अशावेळी आधी गरम पाण्यात कॉफी पावडर घालून ती पूर्णपणे विरघळवून घ्या. यानंतर दुधात हे कॉफीचे मिश्रण मिक्स करून ब्लेंड तयार करा. यामुळे तुमची कोल्ड कॉफी खूप चवदार होईल.
7 / 8
६. कॉफी तयार करताना आपण साधारणपणे भांड्यात सगळे जिन्नस एकदाच एकत्र घालून उकळतो. त्यामुळे कॉफीची चव बिघडते. अशावेळी आधी दूध गरम करायला ठेवा. आता दूध उकळल्यानंतर त्यात कॉफी मिक्स करा. यामुळे कॉफी खूप टेस्टी होईल.
8 / 8
७. कॉफी तयार करताना पाणी घालू नये, पण जर पाणी घालायचेच असेल तर जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करु नका. अशावेळी, २ कप कॉफी तयार करण्यासाठी १/४ कप पाणी घाला. यामुळे कॉफीची चव बिघडणार नाही आणि कॉफी घट्टही होईल.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्स