शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ख्रिसमस पार्टीसाठी सॅलेड डोकोरेशन करण्याच्या एक से एक आयडिया, पाहूनच सगळे होतील खुश..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2022 1:39 PM

1 / 8
१. अनेक हॉटेल्समध्ये ख्रिसमसच्या मोठमोठाल्या पार्टी हाेतातच. पण घरच्याघरी जवळचे मित्रमंडळी आणि नातलग यांना बोलावून छोटेखानी पार्ट्यांचेही आयोजन केलेच जाते.
2 / 8
२. तुमच्या घरीही ख्रिसमससाठी एखादी छानशी पार्टी किंवा गेट टुगेदर ठेवणार असाल तर सलाड डेकोरेशनसाठी या काही खास आयडिया एकदा बघाच. सांता क्लॉस किंवा मग ख्रिसमस थीम घेऊन केलेलं सलाड डेकोरेशन नक्की येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं लक्ष वेधून घेईल. तसेच तुमची पार्टीही या निमित्ताने एकदम हटके हाेऊन जाईल.
3 / 8
३. सध्या बाजारात गाजर, मुळा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. गाजर, मुळा यांचा वापर करून अशा पद्धतीचा सांताक्लॉज नक्कीच करता येईल. चेहऱ्याच्या जागी पेरूचे काप ठेवले तरी चालेल. शिवाय हे करायला देखील अगदीच सोपं आहे.
4 / 8
४. आता नाताळ म्हटलं की सांताक्लॉज सोबत ख्रिसमस ट्री देखील पाहिजेच.. ख्रिसमस ट्री करण्याची ही बघा एक सोपी ट्रिक. करडी, मेथी, पालक अशा भाज्या ख्रिसमस ट्रीच्या आकारात रचून ठेवा आणि मग त्याला गाजराचे काप, चेरी, डाळिंबाचे दाणे लावून डेकोरेट करा.
5 / 8
५. परदेशांत या दिवसांमध्येच स्नो मॅन देखील बनवतात. गाजर, मुळा यांचा वापर करून अशा पद्धतीने स्नो मॅन बनवता येतील. तसेच हिरव्या काकडीचा वापर करून असे छोटे छोटे ख्रिसमस ट्री देखील करता येतील.
6 / 8
६. चीज- चेरी- पायनॅपल हे अनेकांचं आवडीचं सलाड असतं. या ३ पदार्थांचा वापर करूनही त्यापासून असा सांताक्लॉज बनवू शकता.
7 / 8
७. काकडीचे छोटे छोटे काप करून ते टुथपिकने एकमेकांना आणि एखाद्या मोठ्या काकडीला किंवा मुळ्याला जोडायचे. असं छान ख्रिसमस ट्री तयार होईल.
8 / 8
८. स्नो मॅन तयार करण्याची ही आणखी एक सोपी आयडिया.. खूप वेळ नसेल तर अशा पद्धतीने झटपट स्नो मॅन बनवता येतील.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलChristmasनाताळ