Sania Mirza, style icon of Indian tennis, have a look at her stylish and successful journey
सानिया मिर्झा टेनिसची स्टाइल आयकॉन; टॅलेंट विथ स्माइल.. काय खास बात? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 6:51 PM1 / 8सानियाच्या खेळाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा नेहमीच तिच्या स्टाईलचीही झाली... भारताची पहिली वहिली स्टायलिश महिला खेळाडू म्हणून सानिया ओळखली जाते..2 / 8 सानियाचे कपडे, हेअरस्टाईल यांची नेहमीच चर्चा झाली. पण तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात सगळ्यात भाव खाऊन गेली ती तिच्या नाकातली नोज पीन. तिची मोरणी, तिची नोजपीन हे जणू तिचं स्टाईल स्टेटमेंट झालं हाेतं.. 3 / 8मुळची हैद्राबादची असणारी सानिया भारताची सगळ्यात यशस्वी टेनिसपटू म्हणून ओळखली जाते. एवढंच नाही तर महिला दुहेरीच्या जगभरातील अव्वल खेळाडूंपैकी ती एक मानली जाते.4 / 8सानियाचे तब्बल ४३ वेळा दुहेरी किताब जिंकले आहेत. २०१५ यावर्षी दुहेरीतील जगातील पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू म्हणून सानिया ओळखली गेली.5 / 8विम्बल्डन आणि यूएस ओपन ग्रँडस्लॅममध्ये महिला दुहेरीची ती विजेती ठरली होती. स्वित्झरलँडची मार्टिना हिंगिस या दोन्ही स्पर्धांमध्ये तिची पार्टनर होती.. तिच्याच सोबत सानियाने २०१६ ची ऑस्ट्रेलियन ओपनही जिंकली होती.6 / 8सानियाबाबत एक दुखरी बाजू अशी की तिने तब्बल चारवेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेतला, पण तिला त्यात एकदाही पदक मिळवता आलं नाही.. दुखापत, अपयश यामुळे अनेकदा तिला टिकेलाही सामोरं जावं लागलं..7 / 8२०१४ साली सानियानं पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी प्रेमविवाह केला. पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न करतेय, यावरूनही सानियाला खूप टिका सोसावी लागली होती... 8 / 8सानियाचा मुलगा सध्या ३ वर्षांचा आहे. मुलाच्या जन्मानंतर थोडा ब्रेक घेऊन तिने पुन्हा एकदा नव्याने खेळ सुरू केला. आता सानिया स्पर्धेच्या ठिकाणी बऱ्याचदा मुलाला सोबत घेऊन जाते.. कर्तव्य आणि मातृत्व या दोन्ही गोष्टी एकसाथ करण्याचा तिचा यशस्वी प्रयत्न सुरू आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications