शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sara ali khan : कामाख्या देवीच्या दर्शनानंतर ट्रोल होतेय सारा, ट्रोलर्स म्हणाले,... लाज वाटू दे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 5:05 PM

1 / 9
अभिनेत्री सारा अली खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिचं ड्रेसिंग, कधी फिटनेस तर कधी दिलखेचक अदा नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. अलिकडेच सारानं कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर देवळाबाहेरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Sara Ali Khan gets brutally trolled for sharing pictures from Kamakhya temple in Assam) (Image Credit- wikipedia)
2 / 9
हा फोटो पाहून काही सोशल मीडिया युजर्सनी तिच्यावर निशाणा साधला आहे. तुला लाज वाटायला हवी, मुस्लिम असूनही मंदिराच्या बाहेर फोटो का काढलेस असा प्रश्न ट्रोलर्सकडून विचारला जात आहे.
3 / 9
सारा तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी गुवाहाटीला गेली आहे. त्यामुळे सारा आसाम मधील सगळ्यात लोकप्रिय आणि ५१ शक्तिपीठां पैकी एक कामाख्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेली.
4 / 9
तिथले काही फोटो साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. त्यानंतर साराला सोशल मीडियावर तिच्या धर्मावरून ट्रोल करण्यात आले. तुम्ही पाहू शकता या फोटोमध्ये सारा पांढ-या रंगाच्या सलवार सूटमध्ये आहे. गळ्यात आसामचा पारंपरिक स्कार्फ आहे. माथ्यावर टिळा लावला आहे.
5 / 9
साराचे फोटो पाहून काही लोकांनी तिचे कौतुक केले. पण काहींनी मात्र तिला ट्रोल करायला सुरूवात केली. तिच्या धर्मावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तू मुस्लिम आहेस की हिंदू? असा सवाल अनेकांनी तिला केला. अन्य एका युजरने तर तिला हिंदू वा मुस्लिम यापैकी कोणताही एक धर्म निवडण्याचा सल्ला दिला. नाव मुस्लिम, ओळख हिंदू..., माझा सल्ला मान आणि कोणताही एक धर्म निवड, असे या युजरने लिहिले.(Image Credit- moneyscotch)
6 / 9
यापुर्वीही साराला अशा प्रकारच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अशा ट्रोलिंगकडे लक्ष न देताना दुर्लक्ष करताना सारा दिसून येते. (Image credit- vouge india)
7 / 9
काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडियावर अकाऊंवटरून सारानं वर्कआऊट व्हिडीओ शेअर केले होते. ‘ट्रॅव्हल डायरीज’मधून वेगवेगळ्या गोष्टींची माहिती, स्वत:चे अनुभव आणि इतरांना प्रेरणा आपल्या छायाचित्रांच्या ती माध्यमातून देत असते.
8 / 9
वृक्षासनाच्या फोटोसोबतच साराने ‘फोम रोलिंग’ करतानाचेही फोटो टाकले होते. हे फोटो पाहाणार्‍यांना सारा सांगू इच्छित होती की सुटीचा दिवस म्हणजे फक्त लोळायचा आणि रेलून राहायचा नाही तर रोलिंगचाही आहे. हे रोलिंग जे फिटनेस वाढवतं आणि आनंदही देतं.
9 / 9
(Image Credit- Twitter)
टॅग्स :Sara Ali Khanसारा अली खानbollywoodबॉलिवूडAssamआसामViral Photosव्हायरल फोटोज्Templeमंदिर